‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले, असा गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे निलेश राणे चर्चेत आले होते. त्यानंतर शुक्रवारी पुण्यातील सभेत देखील मी शिवसेने बद्दल ठाकरेंबद्दल इतकं बोलूनही शिवसैनिक गप्प बसले म्हणजे सगळेच्या सगळे हिजडे आहे .अशी खालच्या भाषेत टीका निलेश यांनी केली होती. निलेश राणे यांच्या या बेताल वक्तव्यावरून त्यांच्यावर वाकड पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश राणेंच्या बेताल वक्तव्याविरोधात, शिवसेनेच्या विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाच्या प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. फौजदारी दंडसहिता कलम ५०० प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलीस स्थानकामध्ये १५५कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून. याबद्दल लवकरच चौकशी होणार आहे.

काय बोलले निलेश राणे

मी शिवसेनेबद्दल एवढं बोलून सुद्धा शिवसैनिक शांत बसले म्हणजे सगळे हिजडे आहेत कुणामध्ये दम च नाही. तसेच मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय चालत हे जर सांगितलं ना तर अंगावर कपडे राहणार नाही या शिवसेनेच्या नेत्यांच्या. अशी गंभीर टीका निलेश राणे यांनी केली.

निलेश राणेंची वक्तव्ये

सोनू निगमलाही बाळासाहेबांना ठार मारायचं होतं. तसे अनेकदा प्रयत्नही झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन. बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कोणा कोणाचे मृत्यू झाले हे सर्व सांगेन. आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत निलेश राणे यांनी आरोप केले आहेत.

‘आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही का. तुझा देव तुझ्या देवाऱ्यात ठेव मी माझा देव माझ्या देवाऱ्यात ठेवीन.आमच्या नादाला लागायचं नाही. ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढू. मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय काय व्हायचं आम्हाला माहिती आहे. ठाकरे कसे आहेत कळल्यावर लोकच अंगावर कपडे ठेवणार नाहीत’, असं निलेश राणे यांनी म्हटले होते. निलेश राणे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निलेश राणे यांचा प्रतीकात्मक पुतळे जाळन्यात आले होते.