Nimish Kulkarni | शिवाली परब व निमिषच्या अफेअरच्या चर्चांवर निमिषने दिले स्पष्ट उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – Nimish Kulkarni | छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा सध्या महाष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध फॅमिली शो बनला आहे. हास्यजत्रेतील कलाकारांचे मोठा चाहता वर्ग देखील निर्माण झाला त्यांना फक्त राज्यातून नाही तर जगभरातून प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. यामधील प्रसिद्ध कलाकार शिवाली परब (Shivali Parab) हिचा लाखोंनी चाहता वर्ग असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान हास्यजत्रेतील कलाकार शिवाली आणि निमिष कुलकर्णी (Nimish Kulkarni) यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण (Nimish Kulkarni And Shivali Parab Affair) आले आहे. अनेकवेळा ते एकमेंकासोबत दिसत असतात व फोटो देखील शेअर करत असतात. मात्र त्याच्या नात्यावर अभिनेता निमिषने मौन सोडले असून त्याच्या व शिवालीच्या अफेअरवर त्याचे मत मांडले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्र्माची टीम नुकतीच अमेरिकेचा दौरा (Maharashtrachi Hasyajatra America Tour) करुन आली आहे. सर्व माध्यमातून या कलाकारांचे कौतुक केले जात आहे. यामधील शिवाली परब व निमिष कुलकर्णी यांचे अफेअर चालू असल्याच्या चर्चा आहेत. कारण काही दिवसांपूर्वी शिवालीने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. यामध्य़े तिने निमिषचा हात हातात घेतला होता आणि निमिष गोड हसत होता. हा फोटो शेअर करत तिनं लिहिलं होतं की, “माझ्या निब्बाबरोबर डेट.” क्युट बेबी असं हॅशटॅग दिलं होतं. या फोटोमुळे शिवाली आणि निमिष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला. यावर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निमिषने त्यांच्या नात्यावर स्पष्ट मत मांडले आहे. तो म्हणाला “अशा गोष्टी जेव्हा बातम्यांमध्ये आल्या होत्या तेव्हा मला सेटवर 15 ते 20 लोकांनी ते दाखवले होते आणि मला विचारले होते. अनेकांनी मला हे काय आहे ? हे खरे आहे का ? असे विचारले होते.”

तो पुढे म्हणाला की, “वेगवेगळ्या वृत्तसंस्थेने याबद्दल बातम्या केल्य़ा होत्या. प्रत्येकाने त्या पाठवून मला निमिष हे खरे आहे का? अशी एक ओळ लिहिली होती. पण, ही अफवा आहे. असं अजिबात काही नाहीये. आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहोत. उद्या साक्षीने जरी माझ्याबरोबर स्टोरी टाकली, तरी तुम्ही असं काही समजू नका. आम्हाला एकत्र खूप चांगलं काम करायचं आहे, पण ती अफवा मी मात्र खूप एन्जॉय केली होती.” असे मत निमिषने मांडले आहे.

अभिनेता निमिष कुलकर्णी (Nimish Kulkarni) हा अनेक वर्षे मराठी रंगभूमीशी संबंधीत आहे.
तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामध्ये काम करत होता.
नंतर तो स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivar) या मालिकेमध्ये देखील काम केले.
मात्र आता ही मालिका बंद झाली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा हास्यजत्रेकडे वळला आहे.
लवकरच तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो मध्ये झळकणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nora Fatehi | “बॉलीवुडमध्ये सध्या फक्त चारच अभिनेत्रींना काम मिळत आहे,
त्यांना थांबवून मी…” नोरा फतेहीने व्यक्त केली खंत