‘ओपन स्कूल’च्या 10 वी, 12 वीच्या ऑक्टोबरच्या परिक्षेचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ आहेत तारखा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 10 वी 12 वीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. nios.ac.in या अधिकृत वेबसाइटवरुन विद्यार्थी अर्ज करु शकतात. ही परिक्षा 3 ऑक्टोबरपासून 1 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. तर परेदशातून भारतात परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा 3 ऑक्टोबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2019 दरम्यान पार पडतील.

काय आहे NIOS –
‘राष्ट्रीय मुक्त विद्यालय’ हे मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 1989 साली सुरु करण्यात आले होते. याचा उद्देश आहे की देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांना कोठूनही, कमी खर्चात, शाळा, महाविद्यालयात न जाता शिक्षण घेता यावे आणि परिक्षा देता याव्यात. ही जगातील सर्वात मोठी ओपन स्कूलिंग देणारी संस्था आहे.

वेळापत्रक तपासण्याची पद्धत –
1. nios.ac.in या वेबसाइटवर जावे.
2. class 10, 12 date sheets या लिंकवर क्लिक करा.
3. त्यानंतर तुम्ही कोणत्या इयत्तासाठी वेळापत्रक पाहू इच्छितात त्यावर क्लिक करा.
4. प्रिंट आऊट डाऊनलोड करा.

इतर महिती –
– परिक्षेचे रिजल्ट 6 आठवड्यात जाहीर केला जाईल.
– nios.ac.in ही वेबसाइट तपासत रहा.
– परिक्षा 3 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत पार पडेल.

आरोग्यविषयक वृत्त –