Nipah Virus Symptoms | निपाह व्हायरसचा धोका वाढतोय; ‘ही’ आहेत लक्षणे, सामान्य फ्लूकडे करु नका दुर्लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन – Nipah Virus Symptoms | ऋतु बदलामुळे हवामान बदलत आहे आणि यामुळे लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आजारपण येणे ही बाब अगदी साहाजिक आहे. मात्र देशभरामध्ये वाढत्या फ्लू मुळे लोक हैराण झाले आहेत. मात्र साधा फ्लू समजून आजारपणाकडे दुर्लक्ष करणेही धोकादायी ठरू शकते. कारण सध्या निपाह व्हायरसचा धोका वाढला असून वेळेवर उपचार न घेतलास जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतामध्ये निपाह विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून आरोग्य तज्ज्ञही जनतेला सतर्क करत आहेत. निपाह विषाणूचा ताप हा नेहमीसारखा वाटत असला तरी या आजाराची काही लक्षणे आहेत. (Nipah Virus Symptoms)

निपाह व्हायरस या आजाराला झुटोनिक व्हायरस देखील म्हटलं जात आहे. निपाह व्हायरस पसरण्याचे माध्यम हे प्राणी आहे. घोडे, कुत्रे, डुक्कर, बकरी आणि मांजर या प्राण्यांच्या माध्यमातून निपाह विषाणू मानवी शरीरामध्ये प्रवेश करुन धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत. या आजाराची काही लक्षणे ही अगदी सामान्य फ्लू प्रमाणे असल्यामुळे लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र नंतर या आजाराचे संक्रमण वाढल्यासा चिंतादायक परिस्थिती निर्माण होत आहे. (Nipah Virus Symptoms)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निपाह व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर त्याची लक्षणे 5 ते 15 दिवसांपर्यंत व्यक्तीमध्ये
दिसू लागतात. सर्वप्रथम लक्षण असे की त्या व्यक्तीला ताप येऊ लागतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो.
तसेच नंतर खोकला, श्लेष्मा आणि श्वास घेण्यास त्रास होतो. सामान्य फ्लू असेल तर तो काही दिवसांत जातो पण
जेव्हा निपाह व्हायरस शरीरावर परिणाम करू लागतो, तेव्हा ताप कायम राहतो आणि घसा देखील दुखतो.
रुग्णाला उलट्या आणि जुलाब देखील होऊ लागतात. आणि रुग्णाला अशक्तपणा जाणवतो.
तसेच स्नायूंमध्ये देखील वेदना होऊ लागतात. निपाह व्हायरसच्या केसेस देशामध्ये वाढत आहेत.
त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.
सध्या या व्हायरल विषाणूमुळे सामान्य ताप आणि फ्लूकडे देखील दुर्लक्ष करू नये.
काही लक्षणे जाणवू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

OTT Release Marathi Movie | ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात ‘हा’ धमाल कॉमेडी चित्रपट रिलीज; चित्रपटाच्या विषयाने वेधले लक्ष