शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी, समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांनी ‘वनस्थळी’ या संस्थेच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

१९८१ साली निर्मला पुरंदरे यांनी वनस्थळी या संस्थेची स्थापना करुन महिलांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि रोजगारासाठीच प्रशिक्षण यासाठी काम सुरू केलं. सामाजिक काम करताना त्यांनी विविध विषयांवर लेखन देखील केलं. ‘स्नेहयात्रा’ हे त्यांच प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी असुनही त्यांनी आयुष्यभर स्वतच वेगळं व्यक्तिमत्व आणि लेखन शैली जोपासली.