Nitesh Rane | ‘शक्ती कायदा’ अंमलात आणला असता, तर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे तीन मंत्री तुरुंगात असते – नितेश राणे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – ‘शक्ती कायदा’ (Shakti Act) कधी अंमलात येणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) केली होती. आपण लव जिहाद (Love Jihad) तसेच धर्मांतर कायद्यावर बोलतो. पण शक्ती कायदा देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यावर आपण काही बोलत नाही. तो कायदा कधी अंमलात येणार, असे पवार यांनी विचारले होते. यावर भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे साताऱ्यात आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शक्ती कायदा अंमलात आला असता, तर आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) महाविकास आघाडीचे तीन मंत्री तुरुंगात गेले असते, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले आहेत.

 

शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या वेळी (Maha Vikas Aghadi Government) अंमलात आला असता, तर त्यांच्याच सरकारमधील तीन मंत्री या कायद्यांतर्गत तुरुंगात गेले असते. अगदी आदित्य ठाकरे देखील गेले असते. रोहित पवारांनी या कायद्याविषयी अगोदर माहिती घेतली पाहिजे. रोहित पवार पहिल्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून काहीतरी शिकावे. शरद पवार कसे मोजकेच बोलतात आणि कामे जास्त करतात. हा वेगळ्या प्रकारचा पवार दिसतोय. हा सगळीकडे तोंड घालत असतो. तुम्ही अगोदर तुमच्या मतदार संघाची अवस्था पाहा. 2024 ला यांचे निवडून येण्याचे वांदे आहेत, असा खोचक टोला यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रोहित पवार यांना लगावला.

रोहित पवार नेहमी बायडन, पुतीन यांच्या गप्पा मारत असतात.
त्यांनी हे विषय सोडून कर्जत जामखेड म्हणजे आपला मतदारसंघ बघावा.
शक्ती कायदा सक्षम करुन त्याची अंमलबजावणी आमचे सरकार करेल, यात शंका नाही.
यानंतर आम्ही महाविकास आघाडीचे दोन मंत्री या कायद्यांतर्गत आत टाकू, असे देखील राणे यावेळी म्हटले.

 

Web Title :- Nitesh Rane | aditya thackeray along with three leading ministers are in jail nitesh rane on rohit pawar over shakti law

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना शिवरायांबद्दल द्वेष, आकस; पुण्यात सुषमा अंधारेंचा घणाघात

IND vs BAN Test | भारताचे ‘हे’ 3 खेळाडू रचू शकतात इतिहास; व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजाराही समावेश

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार