Nitesh Rane | …तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला? : नितेश राणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nitesh Rane | दिशा सालियान मृत्यु प्रकरण आणि आदित्य ठाकरेंवर रिया चक्रवर्तीला फोन केल्याच्या आरोपावरून सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन चांगलेच तापले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) रिया चक्रवर्तीला ४४ फोन केल्याचा आरोप केला गेला होता. त्याचेच पडसाद आज (गुरूवारी) राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात पहायला मिळाले. (Nitesh Rane)

 

दिशा सालियानच्या मृत्युपूर्वी पार्टीत कोण कोण होते? पार्टीत उपस्थित असलेला मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे हे जर निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना फोन लावून माझ्या मुलाला वाचवा असे का म्हणाले होते? अशा स्वरूपाचा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अधिक चिघळलेले आहे.

 

तसेच या प्रकरणाबाबत बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टची देखील मागणी केली आहे. त्यांनी दिशा सालियान मृत्यु प्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. आणि सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान यांच्या मृत्युचे प्रकरण समोर येताच आदित्य यांचेच का नाव घेतले जाते? असा सवाल करत, दाल मै कुछ काला है असे नितेश राणे म्हणाले.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या सभागृहात बोलताना म्हणाले, दिशा सालियान मृत्यु प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे दिशा सालियान प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे कधीच नव्हता, त्यामुळे सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही.

 

दिशा सालियानच्या मृत्यु प्रकरणात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला. पाच वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं. दिशा सालियान मृत्यु प्रकरणावर विनाकारण कुणी राजकारण करू नये. असे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सभागृहात बोलताना म्हणाले.

 

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर रिया चक्रवर्तीला ४४ फोन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच एयू म्हणजे आदित्य ठाकरे असा त्याचा अर्थ आहे अशी बिहार पोलिसांची माहिती असल्याचा
आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.
यावर विविध मुद्यांवर लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हे जुने प्रकरण उकरून काढले आहे असे प्रतिउत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

 

Web Title :- Nitesh Rane | nitesh rane more serious allegations against aditya thackeray in the disha salian case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक