नितेश राणेंना ९ जुलैपर्यंत पोलिसांचा ‘पाहुणचार’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या खड्ड्यांना जबाबदार धरून महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणे यांनी चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी याप्रकरणावर युक्तीवाद केल्यानंतर न्यायाधिशांनी नितेश राणे यांना ९ जुलै पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर कणकवली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

अटक करण्यापूर्वी नितेश राणे यांनी पोलिसांवर अरेरावी केली. मला अटक केली तर कणकवलीकर तुम्हाला मारतील, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. नितेश राणे आणि त्यांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर नितेश राणे यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. नितेश राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला

मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात होत असलेल्या चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाचा फटका महामार्ग उपअभियंत्याला बसला. स्वाभीमानी संघटेनच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना महामार्गावर चिखलाची आंघोळ घातली. महामार्गाच्या कामावर झालेल्या कामाच्या चुकांमुळे पावसाचे पाणी कणकवली बाजारपेठेत शिरले होते. त्यामुळे नागरिकांचा रोष होता. नितेश राणे यांनी उपअभियंता शेडेकर यांना गडनदीवरील पुलापासून जाणवली येथील पुलापर्यंत चालत नेऊन रस्त्याची दुरावस्था दाखवून दिली. तसेच त्यांना गडनदीवरील पुलाला बांधून ठेवले. याप्रकरणी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

रक्तदान केल्याने ‘या’ आजारांपासून दूर रहाणे आहे शक्य

‘या’ उपायांनी हायब्लड प्रेशरवर आणा नियंत्रण

घरच्या घरीच करा ‘थायरॉईडवर’ जालीम उपाय

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

…तर तुमचही नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देता येईल