Nitin Gadkari | पुण्यात फ्लाईंग बस आणण्याच्या तयारीत गडकरी, ट्रॅफिक जामचा सामना करण्यासाठी ‘हा’ आहे प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nitin Gadkari | केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केवळ पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमध्ये वाढणार्‍या ट्रॅफिक जामच्या समस्येचा सामना करण्यासाठी एक जबरदस्त आयडिया सांगितली आहे. पुण्यात फ्लाईंग बस किंवा ट्रॉली बसची योजना आणली तर पुण्याच्या लोकांची ट्रॅफिक जामच्या समस्येतून सुटका होईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, 2 सप्टेंबर) पुण्यात केले. त्यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील ट्रॅफिकच्या समस्येवर एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यांनी पुण्याच्या ट्रॅफिक समस्यांचा सामना करण्याचे उपाय सांगताना फ्लाईंग बसचा उल्लेख केला. (Nitin Gadkari)

 

पुणे ते साताराकडे जाणार्‍या रस्त्यावर होणारी ट्रॅफिक जाम कमी करण्यासाठी त्यांनी चार मजली रस्त्यांची योजना आणण्याचे सूतोवाच केले. त्यांनी म्हटले की, सातारा रोडवर एलिव्हेटेड रोडच्या निर्मितीचा प्लान आहे. म्हणजे खाली एक रस्ता असेल आणि त्याच्यावर दोन फ्लायओव्हर असतील आणि त्याच्याही वर मेट्रोसारख्या मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. यासाठी मी प्रोजेक्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. (Nitin Gadkari)

 

मुंबईहून 4.30 आणि पुण्याहून बेंगळुरुचा प्रवास 3.30 तासाचा
या दरम्यान नितीन गडकरी यांनी पुणे-बेंगळुरु ग्रीनफील्ड हायवेची सुद्धा माहिती दिली. पुणे-बेंगळुरू ग्रीनफील्ड हायवेचा फायदा हा होईल की मुंबईहून बेंगळुरुला जाणार्‍या गाड्या पुण्यात येण्याऐवजी बाहेरच्या मार्गानेच निघून जातील. यामुळे मुंबईहून बेंगळुरु साडेचार तासात आणि पुण्याहून बेंगळुरू साडेतीन तासात पोहचता येईल. हा रस्ता पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातून जाईल, यातून या भागाच्या विकासाचा मार्गदेखील खुला होईल.

अशा धावतील फ्लाईंग आणि ट्रॉली बस, पहात रहा बस!
गडकरी म्हणाले, आम्ही 165 रोप वे केबल कारची निर्मिती करत आहोत.
आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. तिच्यात 150 लोक बसू शकतात. ती वरून जाते.
अशाप्रकारे जर वरच्यावरच वाहतूकीची सुरुवात झाली तर ट्रॅफिक जामपासून सुटका होईल.
ट्रॉली बसचा सुद्धा एक पर्याय आहे. यामध्ये दोन बस जोडता येऊ शकतात ज्या इलेक्ट्रिक केबलवर चालतात.
इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वा कोटी आहे. त्याच क्षमतेच्या ट्रॉली बस बाबत बोलायचे तर तिची किंमत 60 लाख रुपए आहे.
जर पुणे महानगरपालिकेने अशी कोणतीही तयारी दाखवली तर आम्ही पैशाची गरज पूर्ण करू शकतो.

 

Web Title :- Nitin Gadkari | flying bus for pune to get rid off from traffic jam announced by nitin gadkari union transport minister and bjp leader

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोन्यात 47 रुपयांची तेजी, चांदीत 496 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

 

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण पेटले ! शिंदे गटाने अर्ज दाखल करुन ठाकरे गटाला दिले आव्हान

 

ACB Trap on PSI Dilip Sapate | 45 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक दिलीप सपाटे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात