पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : नितीन गडकरी 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था 

सध्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सर्वत्र रंगल्या असताना, नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे स्पष्ट केले आहे  ते म्हणाले, माझ्या राजकीय आयुष्यात मला माझ्या योग्यतेपेक्षा खूप काही मिळाले आहे त्यामुळे मी कोणत्याही शर्यतीत नाही, पंतप्रधानांच्याही नाही, असे  केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले आहे.
[amazon_link asins=’B06XBCVVDV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1412b154-85c9-11e8-8b4b-e7ba17fd8d0b’]

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत आगामी भाजपला बहुमत न मिळाल्यास सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून आपल्याकडं पाहिलं जात असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना गडकरी यांनी कुठल्याही शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं. ‘मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. मंत्री म्हणून मी खूप समाधानी आहे. मला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची इच्छा नाही,’ असं त्यांनी सांगितलं. ‘पुढील निवडणुकीत भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.