Nitin Gadkari Threat Case | धक्कादायक ! गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीने कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची घेतली होती जीवे मारण्याची सुपारी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी (Nitin Gadkari Threat Case) देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीर कांथा (Jayesh Pujari aka Shakir Kantha) याने कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के.एस. ईश्वरप्पा (Former Karnataka DyCM K.S. Eshwarappa) यांना जीवे मारण्याची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Toiba) आणि पीएफआय या दहशतवादी संघटनांनी (PFI Terrorist Organization) त्याला ही सुपारी दिली होती. मात्र, त्यापूर्वीच तो या प्रकरणात (Nitin Gadkari Threat Case) अडकला. यामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे आरोपी जयेश हा जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) भोगत असून तो लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होता.

 

जयेश एका गुगल पे (Google Pay) नंबरवर पैसे मागवत होता. ज्या खात्यावर पैसे मागवत होता ते खाते एका मुलीचे होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना (Nagpur Police) मिळाली आहे. जयेश हा बेळगाव जेलमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. मात्र, त्यापूर्वी तो पीएफआय संघटनेच्या संपर्कात आला. त्याने या संघटनेसाठी आणखी कोणते काम केले आहे का, याचा तपास पोलीस करणार आहेत.

 

नागपुर पोलिसांची तीन पथके तपासासाठी नागपूरवरून निघणार आहेत.
दोन पथकं बेळगाव आणि बंगळुरू येथील जेलमध्ये जाऊन तपास करणार आहेत.
तर तिसरं पथक त्या गुगल पे अकाऊंटबाद्दल सर्व माहिती गोळा करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांकडून मिळाली आहे.

 

जयेशचे कर्नाटक आणि दक्षिण भारतातील बहुतांश शहरांमध्ये मजबूत दहशतवादी नेटवर्क होते.
त्यामुळेच त्याला ईश्वरप्पा यांची सुपारी देण्यात आली होती. ईश्वरप्पा हे कर्नाटक भाजपचे प्रभावी नेते आहेत.
शिमोगा मतदारसंघातून (Shimoga Constituency) ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
त्यांच्या हत्येत्या सुपारीचे वृत्त समोर आल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गडकरींच्या कार्यालयात फोन केल्यानंतर (Nitin Gadkari Threat Case) जयेश नागपूर पोलिसांच्या रडारवर आला.

 

Web Title :- Nitin Gadkari Threat Case | shocking information in gadkari threat case three teams sent for further investigation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Maharashtra Political News | अजित पवारांच्या भोवती संशयाचे ढग, चार दिवसांनी फडणवीस माध्यमांसमोर आले, मात्र…

Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या बैठकीतील 12 निर्णय