Nitin Gadkari | ‘वेगळ्या विदर्भाचा वाद पुन्हा चर्चेत’, आंदोलन समिती मागणार गडकरींसह १० खासदारांचा राजीनामा

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – Nitin Gadkari | विदर्भातील (Vidarbh) खासदारांना विदर्भाबद्दल प्रेम राहिले नाही. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी (Independent Vidarbh) नितीन गडकरींसह (Nitin Gadkari) विदर्भातील १० खासदारांचा राजीनामा मागणार आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे. संसदेत या खासदारांनी स्वतंत्र्य विदर्भ राज्य व्हावं यासाठी ठराव न मांडल्यामुळे प्रत्येक खासदारांच्या कार्यालयात जाऊन त्यांना राजीनामा मागणार असल्याची माहिती स्वतंत्र विदर्भ आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार (Arun Kedar) यांनी सांगितले आहे.

अरुण केदार म्हणाले की, भूवनेश्वर येथील अधिवेशनात भाजपाने (BJP) वेगळ्या विदर्भासाठी ठराव मांडला होता, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम वेगळा विदर्भ करू, असे आश्वासन भाजपाने दिले होते. आता भाजप सत्तेवर आहे. मात्र तरीही वेगळा विदर्भ केला नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आधी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री झाले, पण स्वतंत्र विदर्भाचा त्यांना विसर पडला. त्यांना आठवण व्हावी यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असे त्यांनी सांगितले. (Nitin Gadkari)

ते पुढे म्हणाले, ‘त्याचबरोबर विदर्भातील ११ जिल्ह्यात आंदोलन होणार आहे.
जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आंदोलनाचे नेतृत्व करतील.
झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड झाले तेव्हा कुठे लोकांचा पाठिंबा होता?
राजकीय तुकडे पाडण्यासाठी भाजपाने ते केले. केवळ तेलंगणा राज्य जनआंदोलनातून निर्माण झाले.
आज तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar bavankule)
याबद्दल बोलताना म्हणाले होते,’लहान राज्यांचे भाजपाने नेहमीच समर्थन केले आहे.
वेगळ्या विदर्भाची भाजपाची भूमिका कायम आहे.’ जेव्हा लहान राज्य गठीत होतील तेव्हा विदर्भ वेगळे राज्य
झाले पाहिजे अशी केंद्रीय नेतृत्वाला आम्ही विनंती केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
यांनी काही महिन्यांपूर्वी दिली होती.

Web Title :-  Nitin Gadkari | will demand resignation of 10 mps including nitin gadkari agitation again for a separate vidarbha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update