Nitin Raut | महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ऊर्जामंत्र्यांचा कारवाईचा बडगा; उपसंचालक सुमित कुमार निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Raut | महावितरणच्या (MSEDCL) भ्रष्ट अधिकाऱ्यांवर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मंत्री राऊत यांनी कठोर भुमिका घेत महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांना निलंबित (MSEDCL Officer Sumit Kumar Suspended) करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश देखील मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे.

 

महावितरणमधील मीटर रीडिंग एजन्सी (Meter Reading Agency) आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या पैशांची मागणी करणे, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धमकावणं असे गंभीर आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर आहेत. दरम्यान, या धमकीची रेकॉर्डिंग क्लिपही उपलब्ध झाली आहे. परंतु, क्लिप उपलब्ध असून देखील ठोस कारवाई होत नव्हती. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करून मुख्य तपास अधिकारी पद मिळवण्याचं काम हा अधिकारी करत होता.

 

दरम्यान, विधानसभेमध्ये (Maharashtra Vidhan Sabha) लक्षवेधी सूचनेला उत्तर देत असताना उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्याचबरोबर मंत्री राऊत यांनी अधिकाऱ्यांना देखील कठोर संदेश दिले आहेत. असं विधानसभेत राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Nitin Raut | energy minister nitin raut action against corrupt officials of msedcl officer Sumit Kumar suspended

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा