विधायक : झाडे लावली तरच ‘तिथे’ मिळणार पदवी प्रमाणपत्र 

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगवर जगभरात गंभीर चर्चा होत असताना धोक्यात आलेल्या वसुंधरेला वाचविण्यासाठी मात्र ठोस उपाययोजना होत असल्याची वास्तवता असली तरी फिलिपाइन्समध्ये एक शक्कल लढविण्यात आली आहे, त्यानुसार पदवी घेण्यासाठी किमान १० झाडे लावण्याची अट घातली आहे. इतकेच नाही तर तसा कायदाही करण्यात आला आहे.

पर्यावरण बचावासाठी फिलीपाइन्सने ही अनोखी शक्कल लढवली आहे. पदवीधर विद्यार्थ्याला आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान 10 झाडं लावावी  लागणार आहेत. देशाने तसा कायदाच केला आहे. जर या कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली तर दर वर्षाला 17 कोटीहून अधिक झाडं लागली जातील.फीलीपाईन्सच्या केंद्र सरकारने ग्रॅज्युएशन लेगसी फ़ॉर द एनव्हायरमेंट या नावाने हा कायदा पारित केला आहे. या कायदा महाविद्यालय आणि शाळांनाही लागू करण्यात येणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी देशाच्या शिक्षण विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.

ADV

सर्वतोपरी शासनाचा
झाडं कुठे लावली जातील याचा निर्णय सर्वतोपरी शासनाचा असेल. स्थानिक स्वराज संस्था आणि शासकीय संस्था या झाडांवर देखरेख करेल. तसेच या झांडाची निगाही या संस्था राखतील. फिलीपाईन्समध्ये मोठ्या प्रमाण जंगलतोड झाल्याने हा कायदा पारित करण्यात आला आहे.