दिलासादायक ! 8 राज्यासह केंद्रशासित प्रदेशात ‘कोरोना’मुळे मृत्यू नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. मात्र मंगळवारी काहीसे दिलादायक चित्र पहायला मिळाले आहे. देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित भागात कोरोना रुग्णाच्या एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. देशात मृत्यूंची संख्या वाढत असताना ही दिलासा देणारी बातमी आहे.

केंद्र सरकारकडून 15 कोटींपेक्षा जास्त लशी पुरवल्या आहेत. त्यामुळे केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत मृत्यूची नोंद झाली नाही. दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, लडाख (यूटी), त्रिपुरा, लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे या भागात कोरोनामुळे हेणारे मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त लसीकरण या भागात केले आहे. राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशात लसीकरणावर भर दिला असून मोफत वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाया गेलेल्या लसीसह एकूण 14 कोटी 64 लाख 78 हजार 983 डोसचा वापर झाला आहे.

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून गेल्या 24 तासात 3 लाख 60 हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तर 2 लाख 61 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये 71.68 टक्के नोंद झाली आहे.

मंगळवारची कोरोनाची आकडेवारी

महाराष्ट्र – 895 जणांचा मृत्यू, 66,358 नवीन रुग्ण
पंजाब – 100 जणांचा मृत्यू, 5932 नवीन रुग्ण, 3774 रुग्णांना डिस्चार्ज
कर्नाटक – 180 जणांचा मृत्यू, 31830 नवीन रुग्ण, 10793 रुग्णांना डिस्चार्ज
गुजरात – 170 जणांचा मृत्यू, 14352 नवीन रुग्ण, 7803 रुग्णांना डिस्चार्ज
दिल्ली – 381 जणांचा मृत्यू, 24149 नवीन रुग्ण, 17862 रुग्णांना डिस्चार्ज