Coronavirus Impact : भारत सरकारच्या नव्या आदेशामुळं परदेशी खेळाडू IPL ला मुकणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रभाव भारतात रोखण्यासाठी केंद्र सरकारने परदेशी नागरिकांना भारतात येण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत त्यांचा व्हिसा निलंबित केला आहे. त्यामुळे आयपीएल खेळण्यासाठी कोणताही परदेशी खेळाडू १५ एप्रिल पर्यंत उपलब्ध नसणार. अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

भारतात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर आयपीएल स्पर्धा २०२० रद्द करण्याची मागणी सर्व स्तरांमधून केली जात आहे. स्पर्धेवर बंदी घालावी म्हणून मद्रास उच्च हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारने सर्व परदेशी नागरिकांवर व्हिसाची बंदी घातल्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंना भारतात येण्यावर निर्बंध आले आहेत.