Sanjay Raut | ‘कोणत्याही वाटाघाटी नाही, 5 वर्ष शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद राहणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – यापूर्वीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister ) वाटणी होत होती. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे (Shivsena) 5 वर्ष पू्र्ण राहणार आहे. यात कोणतेही वाटाघाटी होणार नाहीत. महाविकास आघाडीचे शिल्पकार अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटले आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंकाही नाही. सरकार स्थापन झाले. त्यावेळी एकमुखाने हा निर्णय घेतला होता. आता तोच कायम राहणार असल्याचे पुन्हा एकदा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी स्पष्ट केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून रविवारी नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही. तिन्ही पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन केले. तिन्ही पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कॉग्रेस पक्षातच नाही तर अनेक पक्षात दावेदार आहे. मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणे गैर नाही. 3 स्वतंत्र विचारधारेचे पक्ष असल्याचे राऊत म्हणाले.

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 388 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

आम्ही स्वाभिमानाने सत्तेत आहोत
मी कार्यकर्त्यांना केलेल्या भाषणाचा व्हिडीओ कुणी तरी बाहेर काढला. मी स्वाभिमानाने राहिलं पाहिजे, असे विधान केले होते. भाजपसोबत BJP युती केली त्यावेळी सेनेला वागणूक दिली जात नव्हती. त्याबद्दल मी बोललो होतो. आज राज्यात सेनेचा मुख्यमंत्री आहे. आम्ही स्वाभिमानाने सत्तेत आहोत. त्यामुळे आम्हाला दिल्लीला जायचे असेल तर मुख्यमंत्री म्हणून जातोय. यात गुलामगिरीचा प्रश्नच येत नाही. स्वाभिमानाचे दुसरे नाव हे शिवसेनाप्रमुख आहे. हे समजून घ्या, असे राऊत म्हणाले.

राजकारणात कधी काय होईल सागंता येत नाही
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या विरोधात आघाडी निर्माण केली तर बरोबरची लढाई लढता येईल. प. बंगालमध्ये भाजपचा दारूण पराभव झाला. भविष्यात काय होणार याचे आखाडे बांधता येणार नाही. इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांना राजकारण मुठीत ठेवता आले नाही. त्यामुळे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाहीय’ असंही राऊत म्हणाले.

त्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये
प्रसिध्द राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर ( Political strategist Prashant Kishor ) आणि शरद पवार यांच्या मुंबईतील भेटीवर देखील संजय राऊत यांनी भाष्यं केले आहे.
प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक भेटी झाल्या आहेत.
किशोर आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. आम्ही सुद्धा त्यांची भेट घेतली होती.
राज्यातील राजकीय परिस्थिती, निवडणुकांबाबत माहिती गोळा करून ती पक्षांना देणे हे किशोर यांचे काम आहे.
कधीकाळी प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत होते.
पंजाबमध्ये कॅप्टन अमेंद्ररसिंग, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम केले आहे.
शिवसेनेसाठी सुद्धा त्यांनी काम केले आहे. याचा वेगळा अर्थ काढू नये.
शरद पवार हे नेहमी वेगवेगळ्या लोकांकडून माहिती गोळा करत असता, असा माझा अनुभव असल्याचे राऊत म्हणाले.

… तर विरोधक जबाबदारी घेणार का ?
वारीचा निर्णय सरकारने कोरोना लाट रोखण्यासाठी घेतला आहे.
कोरोना वाढला तर विरोधक रोखणार का? मराठा आरक्षणावर ठाम भूमिका केंद्र सरकारच घेऊ शकते.
त्यामुळे खासदार छत्रपती संभाजीराजे ( MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी दिल्लीत मोर्चा काढावा.
दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव योग्य
नाना पटोले ( Nana Patole) हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय असेल. स्थानिक निवडणुका आहे. त्या स्वबळावर लढण्याचा त्यांचा विचार आहे. यात चुकीचे काही नाही. सरकार स्थापन करताना आम्ही काही करार केला नव्हता. लवकरच खणखणीत बातमी आम्ही देऊ, असेही राऊत म्हणाले. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव योग्य आहे. याबद्दल काही संघटना आंदोलन करत आहे. पण, नाव देण्याची घोषणा झाल्याची राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : no negotiations shiv sena will have cm for 5 years say Sanjay Raut

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा