विनामास्क फिरणे हा सामाजिक अपराध : अलाहाबाद उच्च न्यायालय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा कहर सुरु असतानाही विना मास्क भटकंती करणार्‍यांची संख्या कमी नाही. त्यामुळे कोरोचा वेगाने पसरत आहे. त्यापार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने दखल घेत नागरिकांवर कठोर कारवाईची सूचना पोलिसांना केली आहे.

कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर निघताना मास्क न घालता दिसली तर तिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. उत्तर प्रदेशमधील क्वारंटाइन सेंटर्सची परिस्थिती आणि कोविड 19 रुग्णालयांमध्ये मिळणार्‍या उपचारांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहितयाचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायामूर्ती अजित कुमार यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणासंदर्भात निर्णय दिली आहे.

जर कोणी मास्क घालत नसेल तर तो संपूर्ण समाजाचा गुन्हेगार आहे, असेही न्यायलयाने स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशमधील प्रत्येक पोलीस स्थानकातील पोलिसांच्या टास्क फोर्सने मास्क न लावता फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी. घरीच आयसोलेशनमध्ये राहणार्‍या रुग्णांनाही आरोग्य सुविधा पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. होम आयसोलेशनमध्ये असणार्‍या रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक्स-रे आणि सीटी स्कॅनसाठी वेगळे रुग्णालय असायला हवे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील डॉक्टरांनी सहानुभूतीपूर्वक पद्धतीने कोरोना रुग्णांवर इलाज करावा असेही न्यायलयाने म्हटले आहे.