नाराज पत्नीला घ्यायला जाणे पडले महागात 

नोएडा: वृत्तसंस्था 
 नाराज होऊन माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीला थेट रुग्णायालातच दाखल करावे लागले आहे, पत्नीला वापस आणणे महागात पडल्याचे दिसून आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’af5bdc14-c60c-11e8-85f2-893c57e9c921′]

दिल्ली येथील खिचडी पूर परिसरातील एका युवकाची निठारी येथील युवतीशी तीन वर्षा पूर्वी विवाह झाला होता. काही काळ सौंसर सुखाचा चालला, त्यांना दोन मुले आहेत, मात्र काही काळाने दोघांमध्ये घरगुती वाद निर्माण होऊ लागले, याच वादातून नाराज होऊन पत्नी माहेरी नेघून गेली. नाराज झालेल्या पत्नीला समजावून घरी आणण्यासाठी गेले. मात्र यात समाजवण्या ऐवजी पत्नीला बळजबरी ने घरी नेण्याचा प्रयत्ना केला. यादरम्यान मेव्हणीने गाडीचा पाठलाग केला. आणि गदारोळ करण्यास सुरवात केली, इतकेच नव्हे तर गाडीत बसलेल्या पत्नीने वाचावा वाचावा अशी हाकही दिली. या गदारोळाने तिथे असलेल्या जमावाला अपहरण होत आहे कि काय असे वाटले, आणि त्यांनी गाडी थांबवून दोन्ही युवकांना गाडीतून बाहेर काढून मारण्यास सुरवात केली, यादरम्यान गाडीचे ही खुप नुकसान झाले, या मारहाणीत पती आणि त्याचा  मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

मुलीसाठी ती करायची अमली पदार्थाची परदेशात तस्करी

त्यानंतर त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच हा  पती-पत्नीमधील वादातून  प्रकार घडला आहे,जमावाने गैरसमजातून दोघांना अपहरणकर्ते असल्याने मारहाण केली. या प्रकरणी अद्याप तक्रार देण्यात आली नाही. तक्रार आल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे  पोलिस अधिकारी मनोज कुमार पंत यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2529509-c60c-11e8-8ff4-8d2543d87dc7′]

जाहीरात