“Nok-99 Cup” under 12 Cricket Tournament | ‘नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयन्टस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांचा दुहेरी विजय !

पुणे : “Nok-99 Cup” under 12 Cricket Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक-९९ करंडक’ दिवस-रात्र १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि ब्रिलीयन्टस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. मिलेनियम स्कूल संघाने पहिला विजय नोंदवित गुणांचे खाते उघडले. (“Nok-99 Cup” under 12 Cricket Tournament)

टेंभेकर फार्म्स, सातारा रस्ता येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राजवीर जाधव याच्या ५९ धावांच्या जोरावर मिलेनियम स्कूलने टेंभेकर फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ४ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मिलेनियम स्कूलने २० षटकामध्ये १४९ धावा धावफलकावर लावल्या. राजवीर जाधव याने ५९ धावांची खेळी केली. या आव्हानासमोर टेंभेकर फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १४५ धावांवर मर्यादित राहीला. विवान धुमाळ (३१ धावा), यश एन. नाबाद (२४ धावा) आणि जन्मेश वासरानी (२२ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही.

शर्विल शेवाळे याच्या ८६ धावांच्या खेळीमुळे ब्रिलीयन्टस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा ९४ धावांनी सहज पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. आणखी एका सामन्यात ओंकार पलापूरे याच्या ७६ धावांच्या कामगिरीमुळे जस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला. (“Nok-99 Cup” under 12 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
मिलेनियम स्कूलः २० षटकात ७ गडी १४९ धावा (राजवीर जाधव ५९ (४३, ९ चौकार, १ षटकार), अर्णव कोतवाल १७, सौरभ कुमार ३-१२) वि.वि. टेंभेकर फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १४५ धावा (विवान धुमाळ ३१, यश एन. नाबाद २४, जन्मेश वासरानी २२, अर्णव कोतवाल २-३१, कुश बेडे २-२५); सामनावीरः राजवीर जाधव;

ब्रिलीयन्टस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात २ गडी बाद १८९ धावा (शर्विल शेवाळे ८६ (६४, १५ चौकार), रितम सेन ४०)
वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकः २० षटकात ७ गडी बाद ९५ धावा (अमर कामत १७, ओजस कदादी २-१६, शौर्य शेलार २-१४); सामनावीरः शर्विल शेवाळे;

कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ६ गडी बाद १५५ धावा (अभिनव हरेसमुद्रम ४१, आराध्य चौधरी ३२,
अव्देत अमोंडकर ३२, नित्यन जोशी १-२०) पराभूत वि. जस क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १६.३ षटकात ३ गडी बाद १५६ धावा
(ओंकाल पलापूरे ७६ (४६, १३ चौकार), सार्थक कांदरे नाबाद २०, नफाय जाफरानी २-२७); सामनावीरः ओंकार पलापूरे;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | परदेशातील पार्सलमध्ये ड्रग्स सापडल्याचे सांगून पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा

Babanrao Dhakane Passed Away | माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन; उद्या पाथर्डीत अंत्यसंस्कार

Female Police Officer Suspended In Pune | पुण्यातील महिला पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

‘क्रिप्टो’ करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून 1 कोटीची फसवणूक, बाणेरमधील प्रकार

अनधिकृतरित्या शाळा सुरु करुन पालकांकडून उकळले भरमसाठ पैसे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ajit Pawar | बारामतीमध्ये अजित पवारांना गावबंदी? मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! पोलीस आणि संबंधिताना दिले निवेदन