Nokia पुन्हा एकदा ‘आश्चर्य’चकित करण्यासाठी तयार, कंपनीनं दिली ‘हिंट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकिया पुन्हा एकदा आपल्या आयकॉनिक जुन्या फोनला लॉंच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने या आधी नोकिया 3310 लॉंच करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर देखील कंपनीने जुन्या नोकियाचा क्लासिक फोन पुन्हा एकदा लॉंच केला होता. नोकिया हँडसेटची निर्मिती करण्याचा परवाना हा फिनलैंडची कंपनी एचएमडी ग्लोबलकडे आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी नोकियाचा जुना आणि लोकप्रिय फोन पुन्हा बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

एचएमडी ग्लोबलचे मुख्य उत्पादन अधिकारी जुहो सार्विकस यांनी एक ट्विट केले आहे. मात्र या ट्विटमध्ये त्याने अ‍ॅडिडास ओरिजिनल स्नीकर्सचा फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबतच त्यांनी लिहिले, ‘मला एडिडास ओरिजिनल्सची लिमिटेड ऍडीशनचा जोड मिळाला आहे. याचा अर्थ असा आहे की आपण नवीन नोकिया मूळ फोन लॉंच केला पाहिजे. आता कंपनी नेमका कोणता नोकियाचा जुना आयकॉनिक मोबाइल फोन बाजारात आणत आहे, अशा प्रकारच्या चर्चा जुहू सर्विकासच्या ट्विटवरून सुरू झाल्या आहेत. एकेकाळी नोकियाचे मोबाईल फोन जगावर अधिराज्य गाजवत होते आणि खूप प्रसिद्ध देखील होते.

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजेच एमडब्ल्यूसी 2020 ची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून होईल आणि या काळात एचएमडी ग्लोबल नोकियाचा आयकॉनिक फोन पुन्हा लाँच करू शकेल. सध्या हा फोन काय असेल हे समजू शकलेले नाही. आतापर्यंत कंपनीने नोकिया 3310, नोकिया 8110 4G आणि नोकिया 2720 4G बाजारात आणले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/