Nora Fatehi | नोरा फतेहीच्या रिव्हिलिंग ड्रेसमधील किलर डान्स मुव्ह्जवर नेटकरी फिदा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) ही तिच्या फॅशनने व डान्स मुव्ह्जने चाहत्यांना अवाक करते. नोराच्या डान्स मुव्ह्ज या नेहमी किलर असतात. तिने अनेक म्युझिक अल्बम व आयटम साँगमध्ये (Nora Fatehi Item Song) आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले आहे. नोरा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिचे इंस्टाग्रामवर 45.2 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ती आपल्या व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नोरा फतेहीने  नुकताच एक किलर डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

 

 

अभिनेत्री नोरा फतेही ही तिच्या फॅशन व डान्ससाठी ओळखली जाते.  बॉलीवुडमध्ये तिने तिच्या नृत्य कौशल्याच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नोरा अनेक चित्रपटातील गाण्यांमध्ये (Nora Fatehi Dance Moves) थिरकताना दिसते. त्याच बरोबर डान्सच्या रियलिटी शोचे परीक्षण देखील करताना दिसते. नोराचा नवा ‘हिप हॉप इंडिया’ डान्स शो येत आहे. त्यानिमित्ताने नोराने आपल्य़ा खास ग्लॅमरस अंदाजात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये नोराची फॅशन लक्षवेधी ठरत आहे. डान्सर नोरा फतेही हिने काळ्या रंगाच्या रिव्हेलिंग आऊटफिट (Nora Fatehi Revealing Outfit) परिधान केला आहे. नोराने हेव्ही ज्वेलरी घातली असून तिची ज्वेलरी लक्ष वेधत आहे. याच बरोबर नोराने दिलखेचक अदांनी डान्स मुव्ह्ज केल्या आहेत. नेहमीप्रमाणे नोरा फतेहीने याही व्हिडिओमध्ये जबरदस्त डान्स केला असून तिची ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

बॉलीवुडची सुप्रसिद्ध डान्सर नोरा फतेही  ही चित्रपटाबरोबरच डान्स रियलिटी
शोची परीक्षक म्हणून काम करते. नोराचा आता नवीन ओटीटी डान्स शो
(Nora Fatehi Dance Show) येत आहे. हा ‘हिप हॉप इंडिया’ डान्स शो (Hip Hop India Dance show)
21 जुलै पासून अमेझॉन मिनी टीव्हीवर (Amazon Mini TV) पाहता येणार आहे.
या शोचे मुख्य आकर्षण नोरा फतेही आहे. नोरा सोबतच या शोमध्ये रेमो डिसूजा (Remo D’Souza) देखील असणार आहे.

 

Web Title : Nora Fatehi | nora fatehi sexy dance moves in black leather dress nora controversial expose

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा