Nora Fatehi | बॉलीवुडची प्रसिद्ध डान्सर नोरा फतेहीने सांगितले इंडस्ट्रीचे सत्य; स्ट्रगल पिरियडमध्ये कास्टिंग डायरेक्टरने केले होते गैरवर्तन

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडच्या टॉप डान्सरमध्ये डान्सिंग क्वीन नोरा फतेहीचे (Nora Fatehi) नाव अग्रस्थानी आहे. नोराने अगदी कमी वेळेत बॉलीवुडमध्ये आपले नाव कमावले आहे. आजच तिचा तगडा चाहता वर्ग असून ती एक सुप्रसिद्ध डान्सर बनली आहे. पण सुरूवातीच्या काळात नोरा फतेहीला (Nora Fatehi) बॉलीवुडमध्ये अत्यंत अपमान सहन करावा लागला होता. बुलिंग व रिजेक्शनला देखील तोंड द्यावे लागले होते.

‘साकी साकी’ फेम डान्सर नोरा फतेही हिची आता बॉलीवुडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. पण हे स्थान निर्माण करायला तिला देखील स्ट्रगल करावा लागला होता. (Dancer Nora Fatehi) नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नोराने तिचा स्ट्रगल पिरियड बद्दल व सहन कराव्या लागलेल्या अपमानाबद्दल सर्वांना सांगितले आहे. पहिल्यांदा मुंबईमध्ये आल्यानंतर तिला या सिनेविश्वाबद्दल सत्यता समजली असे नोराने सांगितले.

नोरा फतेही (Nora Fatehi) आपले अनुभव सांगताना म्हणाली की, “मला कॅनडातून भारतात येत असताना भारतात पोहोचताच रेड कार्पेटवर माझे स्वागत होईल, असे वाटत होते. विमानतळावर एक लांबलचक लिमोझिन कार येईल, ड्रायव्हर माझ्यासाठी दरवाजा उघडेल. मात्र, भारतात आल्यावर मला वास्तवाचा सामना करावा लागला आणि या अनुभवावरुन मला कोणीतरी जोरात थप्पड मारल्यासारखे वाटले.” नोराच्या म्हणण्यानुसार, ती भारतात येताच तिचा खूप मोठा भ्रम मोडला गेला.

नोरा फतेहीने मुलाखतीमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा खुलासा केला. तिने मुलाखती दरम्यान सांगितले की तिला ऑडिशनला बोलावले जायचे व तिथे तिला हिंदीमध्ये डायलॉग बोलायला लावायचे. नोरा मुळची कॅनेडाची (Canadian Nora Fatehi) असल्याने तिला हिंदी नीट बोलता यायचे नाही. यामुळे तिला मुद्दाम हिंदी बोलयला सांगायचे व तिच्या बोलण्यावर कास्टिंग डायरेक्टर हसत बसायचे.(Nora Fatehi Songs) या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये नोराला खूप रिजेक्शनला सामोरे जावे लागले होते. मात्र तिने हिंमत न हारता प्रयत्न चालू ठेवले. (Nora Fatehi Dance) नृत्यकलेच्या जोरावर नोराने हळूहळू आपली जागा तयार करण्यास सुरुवात केली. बॉलीवूड डान्सर नोरा फतेहीची साकी साकी (Saki Saki), गर्मी (Garmi), मुकाबला (Muqabla), आयो कभी हवेली पे (Aayo Kabhi Haveli Pe) अशी गाणी हिट झाली आहेत.

Web Title : Nora Fatehi | nora fatehi struggling days when she was bullied for not knowing hindi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या वयावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Pune: Newly-married girl ends life by jumping into Indrayani river; She was being harassed to get money from her parents’ house

Neelam Gorhe join Shivsena | नीलम गोऱ्हेंचा शिवसेनेत प्रवेश, फडणवीस यांची आश्चर्यकारक उपस्थिती (व्हिडिओ)

Parag Karandikar | अभिमानास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

Pooja Hegde | अभिनेत्री पुजा हेगडेच्या हॉट फोटोशुटवर नेटकरी फिदा; बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो व्हायरल

Actress Madhoo | ‘रोजा’ सारखा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री मधूने अचानक का सोडली इंडस्ट्री; सांगितले खरे कारण

Katrina Kaif | कतरिनाचा चाहत्यांसोबत कूल अंदाज; नेटकरी करत आहेत कौतुक