आदिवासी भागात ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात जाहिर झालेल्या मतमोजणीत आदिवासी भागात सर्वाधीक मतदान ‘नोटा’ला झाले आहे. यामध्ये पालघर आणि गडचिरोली मध्ये सर्वाधीक मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना नोटाचा पर्य़ाय उपलब्ध करून दिला आहे.

मतपत्रिकेवरील कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसल्यास नोटा अर्थात नन ऑफ द अबोव्ह (यापैकी कोणीही नाही) असा पर्याय मतपत्रिकेच्या शेवटी देण्यात आला आहे. आदिवासी भागात अनेक अशिक्षित असल्याने त्यांच्याकडून मतपत्रिकेतील सर्वात शेवटचे बटन दाबण्यात आले असावे त्यामुळेच नोटाला जास्त मतदान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यामध्ये पालघर क्षेत्रात नोटाला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते मिळाली आहेत. तर गडचिरोली-चिमूर क्षेत्रात २४ हजार ५९९ नोटाला मते मिळाली आहेत. या शिवाय नंदूरबार, ठाणे या आदिवासी भागात नोटांना मतदान करण्याचे प्रमाण जास्त आहे.

‘नोटा’ टॉप १० मतदार संघ मतदार संघ नोटाची मते टक्केवारी

पालघर २९,४७९ २.४५ %
गडचिरोली-चिमूर २४,५९९ २.१५ %
नंदूरबार २१,९२५ १.७१ %
ठाणे २०,४२६ १.७५ %
मुंबई उत्तर-दक्षिण १८,२२५ १.९४ %
भिवंडी १६,३९७ १.६३ %
मावळ १५,७७९ १.१५ %
जालना १५,६३७ १.२९ %
मुंबई दक्षिण १५,११५ १.८९ %
कल्याण १३,०१२ १.४६ %

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like