स्वारगेट परिसरातील सराईत एक वर्षासाठी स्थानबद्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्वारगेट परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईतावर एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटीज अक्ट) नुसार कारवाई करत पुणे पोलिसांनी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

गोविंदसिंग बाबूलाल टाक (वय. २० वर्षे. रा. डायस प्लॉट गुलटेकडी) असे स्थानबद्ध केलेल्या सराईताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंविंदसिंग टाक हा स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलटेकडी परिसरातील सराईत गुंड आहे. त्याच्यावर साथादारांसह कोयता चाकू. चाकू यासारखी जीवघेणी हत्यारे घेऊन दरोडा, दुखापत, दंगा. जबरी चोरी. महिलांची छेडछाड करणे, यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी कृत्ये २०१७ पासून सुरु आहेत. परंतु त्याच्यावर कारवाई करूनही त्याच्या वर्तणूकीत काहीच बदल होत नाही. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाल्याने नागरिक त्याच्याविरोधात तक्रार करण्यास धजावत नव्हते.

याप्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शहरात सक्रीय व दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार सह पोलीस आयुक्त शिवाजी बोड़के यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी एमपीडीए अंतर्गत टाक याच्यावर कारवाई कऱण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांच्याकडे पाठवविला होता. त्यानंतर त्यांनी २२ फेब्रुवारी रोजी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे. त्यानुसार त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध कऱण्यात आले आहे.

हा प्रस्ताव तयार करण्याकामी पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र कदम, पोलीस नाईक हर्षल दुडम, पोलीस शिपाई भूषण उंडे यांनी परिश्रम घेतले