आता पीएफ बद्दल NO चिंता ! केवळ एक मिस्ड कॉल द्या आणि जाणून घ्या माहिती 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएफ अकाऊंट असणाऱ्या कर्मचाऱ्याला आता आपल्या पीएफ खात्याबाबत चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण आता केवळ एका नंबरवर मिस्ड कॉल करून तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. एवढेच नाही तर तुमच्या पीएफ खात्यावर देखील तुम्हाला नजर ठेवता येणार आहे.

तुमच्या पीएफ अकाऊंटचा स्टेट्स चेक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.  पीएफओच्या अधिकृत संकेत स्थळावर देखील याबाबत महिती देण्यात आली आहे. यात मिस्ड कॉलचा पर्याय अधिक सोयीस्कर आहे. तुमचा जो मोबाईल क्रमांक तुमच्या पीएफ खात्याशी संलग्न आहे. त्या नंबरवरुन 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल करा या कॉल नंतर तुमच्या अकाऊंटमध्ये उपलब्ध असलेल्या पीएफ संदर्भात माहिती मिळणार आहे.

मेसेजची सुविधा देखील उपलब्ध

याशिवाय मॅसेजच्या माध्यमातूनही तुम्ही पीएफ बॅलेन्स जाणून घेऊ शकता. मात्र या दोन्ही सुविधांचा वापर करण्यासाठी तुमचे युएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. जर तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्स माहिती करू इच्छिता तर EPFOHO UAN टाईप करुन 7738299899 वर पाठवा.

विशेष म्हणजे या सेवांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या भाषांचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात एकूण १० भाषांचा समावेश आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास हिन्दीमध्ये बॅलेन्स जाणून घ्यायचा आहे तर EPFOHO UAN HIN टाईप करुन 7738299899 वर पाठवा.

पंजाबीसाठी – PUN
गुजरातीसाठी – GUJ
मराठीसाठी – MAR
कन्नडसाठी – KAN
तेलुगूसाठी – TEL
तमिळसाठी – TAM
मल्याळमसाठी- MAL
बंगालीसाठी- BEN टाईप करा.