आता केबल TV द्वारे मिळणार इंटरनेट, सरकारने तयार केली मार्गदर्शक तत्त्वे , लवकरच मिळणार मान्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता लवकरच आपल्या केबल टीव्ही लाईनसह आपले ब्रॉडबँडही कार्य करेल. सरकारने केबल टीव्हीद्वारे टीव्ही-इंटरनेट देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार केली असून लवकरच त्यास मान्यताही मिळू शकेल. यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना तयार केली आहे. डीसीसी अर्थात डिजिटल कम्युनिकेशन कमिशन लवकरच एजीआर आणि परवाना शुल्काबाबत निर्णय घेईल. या आठवड्यात डीसीसी बैठक घेऊ शकते. कोविड – 19 मुळे देशात घरून काम सुरू आहे. लँडलाइन ब्रॉडबँडची संख्या कमी झाल्याने नेटवर्कमध्ये अडचण आहे.

लॉकडाऊन दरम्यान ब्रॉडबँड कनेक्शनच्या मागणीत 50% वाढ
लॉकडाऊन दरम्यान ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, देशातील 12 कोटी घरांमध्ये केबल टीव्हीचे कनेक्शन आहे. 1 वर्षात 2 कोटींहून अधिक घरात ब्रॉडबँड उपलब्ध होईल. देशात केबल टीव्हीचे 10 कोटी ग्राहक आहेत, अशा प्रकारे केबलच्या माध्यमातून इंटरनेट मिळवणे सोपे होईल.

केबल टीव्हीद्वारे इंटरनेट पोहोचविण्याची तयारी
माहिती व प्रसारण मंत्रालय सर्व समस्या सोडवणार
1-2 महिन्यांत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील
केबल ऑपरेटर, ट्राय आणि टेलिकॉम सेगमेंटशी चर्चा करून शिफारसी मागितल्या
परवाना शुल्क, एजीआरशी संबंधित प्रश्न सोडविणार विभाग
10 कोटी लोक केबल टीव्हीद्वारे दूरदर्शन पाहतात
केबलद्वारे इंटरनेट पोहोचविणे सोपे
ऑपरेटरला पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करावी लागेल