Homeताज्या बातम्याNPS Calculator | तुमची गुंतवणूक होईल 1.33 कोटी रुपये, दरमहिना 26,758 रुपये...

NPS Calculator | तुमची गुंतवणूक होईल 1.33 कोटी रुपये, दरमहिना 26,758 रुपये मिळेल पेन्शन; जाणून घ्या किती गुंतवावे पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NPS Calculator | अर्थसंकल्प 2022 मध्ये नॅशनल पेन्शन सिस्टिम National Pension System (NPS) मध्येही बदल करण्यात आले आहेत. मात्र, हा बदल केवळ सरकारी कर्मचार्‍यांसाठी (Government Employees) आहे. सरकारने आपले योगदान 10% वरून 14% करण्याचा निर्णय घेतला. राज्य कर्मचार्‍यांनाही याचा तितकाच लाभ मिळणार आहे. (NPS Calculator)

 

रिटायर्मेंट फंड आणि एन्युटीचा फायदा
निवृत्तीच्या वयात (Retirement Age) तुम्ही मासिक पेन्शनचीही सहज व्यवस्था करू शकता. अनेकदा उशीरा निवृत्तीचे नियोजन करणार्‍यांसाठी हा एक चांगला पर्याय असतो. नॅशनल पेन्शन सिस्टम हा एक असा पर्याय आहे ज्यात कधीही सहभागी होता येते. ही एक अंशदायी पेन्शन योजना आहे. NPS मध्ये गुंतवणूक करून निवृत्तीनंतर मोठा निधी (Retirement fund) उपलब्ध होतो. यासोबतच एन्युटी रक्कम आणि त्याच्या कामगिरीच्या आधारे मासिक पेन्शन मिळते.

 

NPS Calculator : वयाच्या 35 व्या वर्षी सुरू करा गुंतवणूक
जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 35 व्या वर्षी मासिक एनपीएसमध्ये 10,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली, तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी म्हणजेच 25 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. NPS कॅलक्युलेशनमधू जाणून घ्या की, तुमचा सेवानिवृत्ती निधी किती असेल आणि अंदाजे मासिक पेन्शन (Monthly Pension) किती असेल.

NPS मध्ये मासिक गुंतवणूक : रु 10,000 (रु. 1,20,000 प्रतिवर्ष)

– 25 वर्षांत एकूण योगदान : 30 लाख रुपये

– गुंतवणुकीवर अंदाजे रिटर्न : 10%

– मॅच्युरिटीवर एकूण कॉर्पस : रु. 1.33 कोटी

– एन्युटी पर्चेस : 40%

– अंदाजे एन्युटी दर : 6%

– वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शन : रु 26,758 प्रति महिना

 

(टीप : हे कॅलक्युलेशन एनपीएस कॅल्क्युलेटरवर केले आहे. पेन्शन आणि निधीचे आकडे अंदाजे आहेत. वास्तविक आकडे भिन्न असू शकतात.)

 

वयाच्या 60 व्या वर्षी 1.33 कोटीचा फंड?
NPS मध्ये, जर तुम्ही 40 टक्के एन्युटी (किमान) घेत असाल आणि एन्युटी दर वार्षिक 6 टक्के असेल, तर निवृत्तीनंतर तुम्हाला एकरकमी 80.27 लाख रुपये मिळतील आणि 53.51 लाख रुपये एन्युटीमध्ये जातील. एकूण फंड 1.33 कोटी रुपये असेल. आता या एन्युटीच्या रकमेसह, तुम्हाला दरमहा 26,758 रुपये पेन्शन मिळेल. एन्युटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी जास्त पेन्शन तुम्हाला मिळेल.

 

जास्त पेन्शनसाठी एन्युटी ठेवा
एन्युटी हा खरेतर तुमचा आणि विमा कंपनीमधील करार आहे. या करारानुसार, नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System) मध्ये किमान 40 टक्के रक्कमेची एन्युटी खरेदी करणे आवश्यक आहे. रक्कम जितकी जास्त असेल तितकी पेन्शन जास्त असेल. एन्युटी अंतर्गत गुंतवलेली रक्कम निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात मिळते आणि एनपीएसची शिल्लक रक्कम एकरकमी काढता येते.

NPS : सर्वात स्वस्त पेन्शन प्लॅन
टॅक्स प्लॅनर वेद जैन यांच्या मते, भारतातील कोणताही नागरिक एनपीएसमध्ये सहभागी होऊ शकतो. NRI यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. एनपीएस ऑनलाइन-ऑफलाइन घेता येते. तुम्ही ते बँकेतून घेऊ शकता. ते खूप लवचिक आणि सोपे आहे. एनपीएस ही अत्यंत रेग्युलेटेड आणि लो कॉस्ट स्कीम आहे. ही जगातील सर्वात स्वस्त पेन्शन योजना आहे. त्यासाठी फक्त 0.1 टक्के शुल्क लागते. पॉवर ऑफ कंपाउंडिंग’ (Compounding) चा लाभही मिळतो.

 

त्यांचे म्हणणे आहे की, NPS बाबत काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ, पॉइंट ऑफ पर्चेस बँक आणि ऑनलाइन आहे, जे अद्याप यूजर फ्रेंडली नाही.
तुमच्यासाठी कोणीही येऊन खाते उघडून देणार नाही. तुम्हाला कोणताही फॉर्म दिला जाणार नाही. तुम्हाला ते स्वतः ऑनलाइन करावे लागेल.
तुम्हाला रिटायरमेंट फंड लॉक करायचा असेल तर हा एक चांगला मार्ग आहे.

 

Web Title :- NPS Calculator | nps calculator how to make money turn your rs 10000 per month investment into crores get rs 26758 monthly pension

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांखाली, गेल्या 24 तासात 25,175 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

व्यवसाय सुरू करण्यासाठी PMEGP योजनेंतर्गत मोदी सरकार देतंय सबसिडीसह 25 लाखापर्यंतचे कर्ज, असा करा अर्ज

 

Home Remedies For Periodontal Disease | हिरड्यांच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 5 घरगुती उपायांनी मिळेल आराम; जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News