व्यवसाय सुरू करण्यासाठी PMEGP योजनेंतर्गत मोदी सरकार देतंय सबसिडीसह 25 लाखापर्यंतचे कर्ज, असा करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMEGP | ‘यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’नुसार अमेरिकेतील लोकांचा नोकर्‍यांबाबत भ्रमनिरास होत आहे. ही स्थिती केवळ अमेरिकेचीच नाही तर जगातील प्रत्येक देशाची आहे आणि भारतही त्यातून अलिप्त नाही. मोदी सरकार (Modi Government) सत्तेवर आल्यापासून प्रत्येक क्षेत्राचे खाजगीकरण करत आहे, अशा स्थितीत देशात सरकारी नोकरी मिळणे कठीण होत आहे. (PMEGP)

 

त्याचबरोबर खासगी क्षेत्राची अवस्था इतकी बिकट आहे की, कामाची वेळ ठरलेली नाही, रजा मिळत नाही आणि काही ठिकाणी वातावरण इतके बिकट आहे की, कर्मचार्‍यांच्या खात्यात पगारही वेळेवर येत नाही. त्यामुळे देशातील तरुण स्टार्टअप म्हणजेच स्वयंरोजगाराच्या संधी शोधत आहेत.

 

तुम्हालाही तुमचा एखादा रोजगार सुरू करायचा असेल पण तुम्हाला पैशाची समस्या भेडसावत असेल, तर तुम्ही मोदी सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (PMEGP) अंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी त्याची नीट माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ते जाणून घेऊया…

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात

 

देशातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

यासाठी लाभार्थीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.

या योजनेत 10 ते 25 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

कोणत्याही प्रकारचा उद्योग सुरू करण्यासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

देशातील सर्व बँका या योजनेअंतर्गत कर्ज देतात.

योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांसाठी 25 टक्के तर शहरी भागातील नागरिकांसाठी 15 टक्के अनुदान दिले जाते.

 

याप्रमाणे करा अर्ज

अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट http://www.kviconline.gov.in/ वर जावे लागेल.

यानंतर होम पेजवर PMEGP स्कीमवर क्लिक करा.

यानंतर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना पोर्टल उघडेल.

Online Application Form For Individual वर क्लिक करा.

तुम्हाला Non Individual फॉर्म भरायचा असेल, तर दिलेल्या Online Application Form For Non Individual वर क्लिक करा.

आता अर्ज तुमच्यासमोर उघडेल.

अर्जात विचारलेली माहिती अचूक भरा.

यानंतर Save Applicant Data वर क्लिक करा.

यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.

 

Web Title :- PMEGP | Prime Ministers Employment Generation Programme (PMEGP) | to start employment under the pmegp scheme the government is giving a loan of up to 25 lakhs with subsidy apply like this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Periodontal Disease | हिरड्यांच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 5 घरगुती उपायांनी मिळेल आराम; जाणून घ्या

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं ट्वीट; म्हणाले – ‘मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ 8 शिवसेना नेत्यांना अटक होणार’

 

Sinus Symptoms | हिवाळ्यात वाढते बंद नाक-सर्दीची समस्या, असा मिळवा आराम; जाणून घ्या