NPS Traders | राष्ट्रीय पेन्शन योजना देते छोट्या व्यापार्‍यांना वृद्धत्वात पेन्शनचा आधार, जाणून घ्या सरकारी योजनेचा कसा घ्यायचा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – NPS Traders | वृद्धत्वाच्या काळात उत्पन्नाची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार एनपीएस म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजनेची (NPS Traders) सुविधा देत आहे. भारत सरकारच्या या योजनेतून व्यापारी वर्गसुद्धा आपल्या म्हातारपणात पेन्शन सुविधेचा लाभ घेऊ शकतो.

 

भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयांतर्गत येणारी सामाजिक सुरक्षा संघटना कामगार कल्याण महासंचालनालयाने (DGLW) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

 

सामाजिक सुरक्षा संघटना कामगार कल्याण महासंचालनालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, व्यापार्‍यांसाठी सुद्धा सरकार विचार करते, राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत (NPS Traders) स्वयंरोजगाराला सुद्धा पेन्शन मिळेल, आजच एनपीएस ट्रेडर्सकडून आपली वृद्धावस्था सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी http://maandhan.in वर जा किंवा हेल्पलाईन नंबर 14434 वर कॉल करा.

कोण घेऊ शकतात एनपीएस ट्रेडर्सचा लाभ

– एनपीएस ट्रेडर्समध्ये अर्ज करण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

– अर्ज करणार्‍या व्यापार्‍याचे वय 18 वर्ष ते 40 वर्षादरम्यान असावे.

– जर अर्जदार करदाता असेल तर या योजनेत सहभागी होण्यास पात्र नाही. या योजनेत केवळ ते व्यापारी सहभागी होऊ शकतात जे प्राप्ती करदाते नाहीत.

– योजनेत मासिक प्रकारे 55 रुपये ते 200 रुपयांपर्यंत मासिक योगदान करावे लागेल.

 

योजनेत असे सहभागी व्हा

1. जवळच्या जनसेवा केंद्रावर जाऊन योजनेत सहभागी होऊ शकता.

2. यासाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती कागदपत्र म्हणून द्यावी लागेल.

3. किंवा www.maandhan.in वर जावून सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकता.

 

Web Title :- NPS Traders | national pension scheme gives pension to small businessmen know how you can take advantage of this government scheme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | क्लिप पाहून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या 5 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील घटना

Salman Khan | ‘भाईजान’ सलमान खानला ‘सर्पदंश’ ! 7 तास हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट; पनवेलच्या फार्म हाऊसमधील घटना

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

GST | सोसायटीमध्ये राहत असाल तर मेंबर-फीमध्ये 2017 पासूनचा ‘जीएसटी’ द्यावा लागेल, 1 जानेवारीपासून नियम आणतंय सरकार, जाणून घ्या

Vitamin D Deficiency | ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे वाढतोय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, दरवर्षी सुमारे 1.79 कोटी लोकांचा होतोय मृत्यू