‘हाय-साईड स्लिट’ मॅक्सी ड्रेसमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचाचं गोर्जियस लूक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा सर्वात मोठा अवॉर्ड शो फिल्मफेअर यावेळी 15 फेब्रुवारी 2020 रोजी आसाममध्ये होणार आहे. याआधी रविवारी मुंबईत कर्टेन-रेझरचे आयोजन करण्यात आले होते. या कर्टेन-रेजरमध्ये बॉलिवूडमधील अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

https://www.instagram.com/p/B8GFv-KlObr/

या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, अलाया फर्निचरवाला, अनन्या पांडे आणि बऱ्याच सुंदर अभिनेत्री बोल्ड लूकमध्ये आल्या होत्या पण सध्या लाईमलाइटमध्ये आली ती म्हणजे अभिनेत्री नुसरत भरुचा.

https://www.instagram.com/p/B8GFMk2JYNI/

यादरम्यान, ग्रीन कलरच्या हाय साईड स्लिट मॅक्सी ड्रेसमध्ये नुसरतने सगळ्यांचे लक्ष वेधले. अभिनेत्री आपला टॅटू फ्लॉन्ट करताना दिसली. मिनिमल मेकअप, ओपन हेअर, न्यूड लिपस्टिकने अभिनेत्रीचा लूक परिपूर्ण केला होता. नुसरतचे हे फोटो सोशल साइटवर खूप व्हायरल होत आहेत, ज्यांना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

https://www.instagram.com/p/B8F8s4Opd1E/

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर नुकतीच नुसरत ‘ड्रीम गर्ल’मध्ये दिसून आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना देखील होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजावाजा करणारा ठरला. तसेच राजकुमार राव यांच्यासोबत नुसरत ‘छलांग’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 31 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.