केजरीवालांच्या ‘सम-विषम’वर केंद्र सरकार ‘नाराज’, नितीन गडकरींनी गरज नसल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिल्लीमध्ये सम-विषम योजना पुन्हा सुरु केली असून 12 दिवस हे चालणार आहे. 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान हि योजना चालणार असून यामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये ६ दिवस ईवन नंबर वाल्या गाड्या चालणार असून 6 दिवस ऑड नंबर असलेल्या गाड्या चालणार आहेत. त्यावर आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केले आहे.

याविषयी बोलताना गडकरी म्हणाले कि, या प्रकारची काहीही आवश्यकता नसून दिल्लीच्या चारही बाजूला रिंग रोड बनविल्याने प्रदूषणामध्ये घट झाली आहे. या फॉर्म्युल्यामुळे दिल्लीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागल्याचे आपण यापूर्वी पहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केजरीवाल सरकारने हा अव्यवहारिक निर्णय घेतल्याचे देखील गडकरींनी म्हटले.

दिल्लीतील रस्त्यांवर ऑड- ईवन
4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान हि योजना चालणार असून यामध्ये ६ दिवस ईवन नंबर वाल्या गाड्या चालणार असून 6 दिवस ऑड नंबर असलेल्या गाड्या चालणार आहेत.

फटाके न उडवण्याचा सल्ला
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासाठी दिल्लीकरांना आणखी एक आवाहन केले आहे. दिल्लीत दिवाळीच्या वेळी देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे यावेळी दिल्लीकरांनी फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात दिल्लीकरांना सरकारकडून मास्क देखील वाटण्यात येणार आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like