महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षित यांच्याकडून आचारसंहितेचा भंग

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आचारसंहिता लागू केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मेट्रोचे काम लवकर संपवू आणि एखादी तरी मेट्रो सुरु करू असे आश्वासन देत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षित यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी दिली.

ब्रिजेश दिक्षित महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.  लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात देशभरात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची आश्वासने देण्यास मनाई आहे. त्यानंतर ब्रिजेश दिक्षित यांनी या कालावधीत महामेट्रोची पत्रकार परिषद घेतली.  त्या पत्रकार परिषदेत त्यांनी डिसेंबर पर्यंत महामेट्रोचा एखादा मार्ग सुरु करण्याचे आश्वासन दिले.  असे जिल्हा निवडणूक विभागाच्या निदर्शनास आले.  त्यानंतर अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार ब्रिजेश दिक्षित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.