निरव मोदीच्या मागची सीबीआयची चौकशी थांबवण्यासाठी अधिकाऱ्याची उचल बांगडी

नवी दिल्ली : राष्ट्रीय वृत्तसंस्था – मोदी सरकार आणि सीबीआय यांच्यातील संघर्ष थांबवण्याचे नावच घेत नाही. आज सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने आपल्या बदली संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी आपली बदली नागपूरला करण्याचे कारण पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा आरोपी निरव मोदींच्या केस मध्ये आपण करत असलेला  तपास आहे असे सर्वोच्च न्यायालयात म्हणले आहे.

बदलीचा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. पीएमजी घोटाळ्यात सरकार दाखवत असल्याचे म्हणत काँग्रेसने सरकारवर टीकेची राळ उडवली होती.तर सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थान हे लाचखोर असल्याचा आरोप केला होता. तसेच याच प्रकरणाचा तपास   चौकशी करणाऱ्या पथकात मनीष कुमार सिन्हा यांचा समावेश होता त्यांची हि तातडीने नागपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. या अचानक  बदल्या केल्याने या प्रकरणात सरकारचा कोणता हस्तक्षेप आहे का असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात आहे.

मनीष कुमार सिन्हा यांची याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाकडे सोपवण्यात आली असून न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचाही समावेश त्या घटनापीठात आहे. विशेष बाब हि कि उद्या केंद्र सरकारने सीबीआय  अधिकाऱ्याना सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या खटल्यावर हेच घटनापीठ न्याय देण्याचे काम पाहणार आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. अलोक वर्मा यांची मोदींनी तातडीची बदली केली होती त्या बदली वर त्यांनी  सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले होते.