Old Mumbai-Pune Highway | तीन दिवस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

लोणावळा : Old Mumbai-Pune Highway | उद्यापासून नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरू होत आहे. तीन दिवस कार्ल्याचा एकवीरा देवीची यात्रा (Ekvira Devi Temple Lonavala Karla) असल्याने भाविकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे परिसरात वाहतुक कोंडी (Traffic Jam) होत असल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Old Mumbai-Pune Highway) अवजड वाहनांना बंदी (Heavy Vehicle Ban) घालण्यात आली आहे.

यात्रा काळात कार्लाफाटा ते वेहेरगाव मार्गावर आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने दोन्ही मार्गावर जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

अशी असेल वाहतुक व्यवस्था

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान कार्लाफाटा ते एकवीरा देवी पायथा मंदिर या मार्गावर जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार, २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Old Mumbai-Pune Highway) सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातली आहे.

२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक लोणावळा व तळेगाव येथून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai-Pune Express Highway) या पर्यायी मार्गाने वळवण्यात येतील.

कार्लाफाटा ते एकवीरादेवी पायथा मंदिर दरम्यान १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी.
२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावर
लोणावळा-कुसगाव बुद्रुक टोलनाका-वडगाव फाटा मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड व
अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती खंडाळा कुसगाव टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजूने वळवली जाणार आहे.

२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन
वडगाव तळेगाव फाटा- लोणावळा मुंबई बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद
करुन ती तळेगावफाटा येथून उसे खिंड, उसे टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन मुंबई बाजूकडे जातील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यात लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेची छापेमारी; ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक,
११ जणांची चौकशी सुरू

Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या भाषणाने सरकार हादरले,
आरपारच्या लढाईची घोषणा करताच मराठा आरक्षणावर भाजपचे सूचक ट्विट