Old Pension Scheme | ६५ लाख पेन्शनर्ससाठी खुशखबर! सरकारने दिली मंजूरी, ‘या’ तारखेपासून जास्त येईल पेन्शन

नवी दिल्ली : Old Pension Scheme | देशभरातील विविध राज्यांतील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना (OPS) सुरू करण्याची मागणी करत असताना आंध्र प्रदेश सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. होय, आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनच्या रकमेत १० टक्के वाढ करण्यावर सहमती झाली आहे. राज्यातील सध्याचे सामाजिक निवृत्ती वेतन २,५०० रुपयांवरून २,७५० रुपये प्रति महिना करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यातील सुमारे ६५ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे (Social Pension Scheme).

१३०.४४ कोटींचा अतिरिक्त बोजा

राज्यात सध्या ६२ लाख पेन्शनधारक असून २.४३ लाख या महिन्यात सरकारच्या या योजनेशी जोडले जातील. नवीन पेन्शनधारक आणि जुन्या पेन्शनधारकांना १ जानेवारी २०२३ पासून वाढीव पेन्शन दिली जाईल. सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले की, पेन्शनमधील या बदलामुळे सरकारवर दरमहा १३०.४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. (Old Pension Scheme)

या प्रस्तावांनाही मंजुरी

याशिवाय मंत्रिमंडळाने उर्जेच्या अपारंपरिक स्त्रोतांच्या वापरासाठी ङ्कपंप स्टोरेजङ्क आणि जलविद्युत प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आंध्र प्रदेश पंप स्टोरेज इलेक्टिड्ढसिटी प्रमोशन पॉलिसी-२०२२ लाही मंजुरी दिली. वायएसआर जिल्ह्यात जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड (JSW Steel Ltd.) चा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी आणि राज्यात एकूण १,६०० मेगावॅट पंप हायड्रोस्टोरेज प्रकल्प उभारण्यासाठी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रस्तावांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

अनेक राज्यांतील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी करत आहेत.
दरम्यान, अनेक राज्य सरकारांनी जुनी पेन्शन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
मात्र केंद्र सरकारकडून लोकसभेत या विषयावर भूमिका स्पष्ट करणारे निवेदन देण्यात आले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
एनपीएस (NPS) चे पैसे परत करण्याची तरतूद नाही, असेही म्हटले आहे.

Web Title :- Old Pension Scheme | andhra pradesh govt increases social pension to rs 2750 per month to 65 lack people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’ रूटीन फ़ॉलो; जाणून घ्या

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम