Old Pension Scheme | संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा, संप काळातील 7 दिवसांची पगारी रजा मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी यासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप (Government Employees Strike) केला होता. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने (State Government) मोठा दिलासा दिला आहे. संप काळात (Old Pension Scheme) कर्मचाऱ्यांचे वेतन कापले जाणार नसून त्या पगारी रजा (Paid Leave) ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

संपाच्या काळातील सात दिवसांचा कालावधी असाधरण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचं यापूर्वीच राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे संप काळातील वेतन कापले जाणार होतं. त्यामुळे राज्यभरातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारातून तब्बल 1200 कोटी रुपये कपात केली जाणार होती. मात्र या निर्णयाला कर्मचारी संघटनांनी विरोध केला होता.

 

कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा संप करण्याचा इशारा दिला होता.
यानंतर संप काळातील वेतन कपात केली जाणार नाही, असा शासन निर्णय जारी करण्यात आला.

 

राज्यात जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी यासाठी राज्यातील सर्व
सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 14 मार्च ते 20 मार्च या कालावधीत संप केला होता.
या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा सात दिवसांचा पगार कापला जाणार नाही, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Old Pension Scheme | The striking employees will get relief, 7 days paid leave during the strike period

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिका नोकरभरती : दुसर्‍यांदा मुदतवाढ, आतापर्यंत 8774 अर्ज

Baramati NCP MP Supriya Sule | विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी; निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी

Pune ACB Trap | 10 हजाराची लाच घेणारा मावळ तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

ACB Arrest PSI Ganesh Shinde | लाच घेण्यासाठी आला अन् 9.50 लाख रुपयांसह 250 ग्रॅम सोनं गमावून बसला, लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले