OMG 2 Teaser Out | लांब जटा व गळ्यात रुद्राक्षांच्या माळा अशा अक्षयच्या जबरदस्त लुकमध्ये ओएमजी 2 चा टीझर आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – OMG 2 Teaser Out | बॉलीवुडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा नेहमी विविधांगी भूमिका साकारताना दिसतो. अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा ओएमजी 2 (OMG 2) चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलिज करण्यात आला आहे. (OMG 2 Teaser Out) या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) भगवान शंकराची भूमिका साकारताना दिसत आहे. ओएमजी 2 चित्रपटाचा टीझर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलिज करण्यात आला असून टीझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभिनेता अक्षय कुमारचा ओएमजी (OMG Movie) चित्रपट देखील खूप गाजला होता.
त्याच पार्श्वभूमीवर ओएमजी2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज चित्रपटाचा टीझर रिलिज करण्यात आला आहे.
यामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसत असून कांतीशरण हा भगवान शंकरावर
मनापासून श्रद्धा असणार आस्तिक कांती शरण मुत्कल हे पात्र साकारत आहे. तो भगवान शंकराची मनोभावे पुजा, आराधना करत असतो
व संकट काळात शिवाचे स्मरण करत असतो. (Har Har Mahadev) चित्रपटामध्ये शंकराची भूमिका अक्षय कुमारने साकारली असून भक्ताच्या मदतीला भगवान शिव आलेले टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. अक्षयचा मोठी जटा व गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला लूक सर्वांना भावत आहे. टीझरमध्ये कांती शरण मुत्कल शिवलिंगाची पुजा करताना अभिषेक शंकररुपी अक्षय कुमार वर होत आहे असे दाखवण्यात आले आहे. सर्वांना चित्रपटाचा टीझर आवडला (OMG 2 Teaser) असून अवघ्या काही मिनिटांमध्ये टीझरला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. सर्वजण कमेंटमध्ये अक्षय कुमारच्या लुकचे कौतुक करत आहेत.

बहुचर्चित अशा ओएमजी 2 चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार शिवशंकराची भूमिका साकारताना दिसणार असून
अभिनेता अरुण गोविल (Arun Govil) प्रभू श्री रामाची भूमिका (Jay Shree Ram) साकारताना दिसणार आहेत.
त्याच बरोबर अभिनेता पंकज त्रिपाठी व अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय (Amit Rai) यांनी केले असून येत्या 11 ऑगस्ट रोजी ओएमजी 2 (OMG 2 Release Date)
चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता होती आता चित्रपटाच्या जबरदस्त टीझरनंतर(OMG 2 Teaser Out) व अक्षय कुमारच्या लूकमुळे (OMG 2 Akshay Kumar Look) प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट
पाहत आहेत.

Web Title : OMG 2 Teaser Out | akshay kumar omg 2 teaser release lord shiva look yami gautam pankaj tripathi arun govil amit rai directed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | समाज माध्यमांवर घातक शस्त्रांचा फोटो ठेऊन दहशत निर्माण करणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

Uddhav Thackeray | ‘माझा ‘कलंक’ शब्द एवढा प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले-‘मी जे म्हटलं ते योग्यच!’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | शिंदे गटाच्या आमदारांसाठी ‘मातोश्री’ची दारं खुली आहेत का?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… (व्हिडिओ)