#Video : बिना ब्लाऊजच्या व्हिडीओनंतर प्रियंकाचा दुसरा व्हिडीओ VIRAL , कॅमेऱ्यासमोरच तिला नेसवली साडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडाचा बिना ब्लाऊजवाला व्हिडीओ नुकताच समोर आला होता. यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती कारण हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर आता प्रियंका पु्न्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रियंका लॉरा ब्राऊनला साडी नेसवताना दिसत आहे. तेही कॅमेऱ्या समोर. केवळ तीन सेफ्टीचा पिनचा वापर करत किती सहज सोप्या पद्धतीने साडी नेसवता येते असे ती सांगत आहे. यात प्रियंका आणि लॉराची बाँडिंग किती छान आहे तेही दिसून येत आहे.

सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. प्रियंका लॉराला साडी कशी नेसायची हे शिकवताना दिसत आहे. यावेळी प्रियंका मात्र सूटाबूटात दिसत आहे. जेव्हा प्रियंका लॉरा साडी नेसवते तेव्हा ती खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहे. साडी नेसल्यानंतरचा आनंद लॉराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अवघ्या पाच तासात हा व्हिडीओ 23 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Loading...
You might also like