कॅन्सरशी झुंज देतोय ऑस्ट्रेलियाला जागतिक विजेता बनवणारा ‘हा’ क्रिकेटर ; तिसऱ्यांदा झाली शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये समावेश असणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने मोठा खुलासा केला आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर त्वचेचा कर्करोग असल्याचे त्याने जाहीर केले आहे. अलीकडेच त्याच्या कपाळावर त्वचेच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करून त्याचा फोटोही शेअर केला. मिळालेल्या माहितीनुसार क्लार्क 2006 पासून या शस्त्रक्रियेमुळे त्रस्त असून हे त्याचे तिसरे ऑपरेशन झाले आहे. 38 वर्षीय क्लार्कने कपाळाच्या ऑपरेशननंतर हा फोटो इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

क्लार्कने त्याचा ब्लॅक अँड व्हाईट कलरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिले की, ‘आणखी एक दिवस, त्वचेची आणखी एक कर्करोग शस्त्रक्रिया. सर्व तरुणांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की सूर्यापासून बचावासाठी तुम्हाला योग्य मार्ग अवलंबला पाहिजे.’ मिळालेल्या माहितीनुसार क्लार्कने 2006 मध्ये यापूर्वीही कर्करोगाची शस्त्रक्रिया केली होती. तेव्हा कपाळ सोडून त्याच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली होती. विशेष म्हणजे, माजी कर्णधार इयान चॅपल यांनीही यावर्षी जुलैमध्ये खुलासा केला होता की तेही त्वचेच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका असतो. क्रिकेटचे खेळाडू बहुतेक वेळा मैदानावर उन्हात राहतात. विशेषतः कसोटी सामन्यांच्या वेळी हा क्रम 5 दिवस टिकतो. अशा वेळी सूर्याकिरणांचा त्यांच्या त्वचेवर जास्त गंभीर परिणाम होऊ शकतो.

2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला जागतिक विजेतेपद मिळवून देण्यात तत्कालिन कर्णधार मायकेल क्लार्क चा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली होती. सध्या तो क्रिकेटमध्ये समालोचन (कॉमेंट्री) करत असताना दिसतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like