OMG! गायीने कुत्र्याचे तोंड असलेल्या वासराला दिला जन्म, मग लोक ‘या’ कारणामुळे अर्पण करू लागले ‘नैवेद्य’

पीलीभीत : वृत्तसंस्था – OMG! जगात निसर्गाचे अनेक आश्चर्यकारक OMG! कारनामे अनेकदा पहायला मिळतात. असाच एक अनोखा कारनामा युपीच्या पीलीभीत (Pilibhit) मध्ये पहायला मिळाला. येथे एका गायीने कुत्र्याचे तोंड असलेल्या वासराला जन्म दिला. याबाबत माहिती मिळताच लोकांनी एकच गर्दी केली. येथे येणारा प्रत्येकजण हे वासरू पाहून स्तब्ध होत होता. पाहता-पाहता विविध प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या. काही लोक यास निसर्गाचा चमत्कार म्हणत नैवेद्य अर्पण करू लागले.

पीलीभीत जिल्ह्याच्या बीसलपुर तालुक्यातील रामनगर जगतपुर गावात राहणार्‍या केदारी लाल यांच्या एका गायीने वासराला जन्म दिला, परंतु वासराचे तोंड आणि उंची एखाद्या कुत्र्याच्या पिल्ला इतकीच होती. वासराच्या जन्मानंतर केदारी लाल यांच्या घरी लोकांनी गर्दी केली आहे. आश्चर्य म्हणजे आता लोक या वासराची पूजा करत आहेत.

गायीच्या मालकाचे काय म्हणणे आहे
गायीचे मालक केदारी लाल यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या गायीने यापूर्वी सुद्धा वासराला जन्म दिला होता जे गायीसारखेच होते. पण यावेळी अनोखे रूप पहायला मिळाले, जे कुत्र्यासारखे आहे. त्यांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे.

Web Titel :- OMG | UP in pilibhit a cow gives birth to doggy like calf people throngs to see

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Corona Vaccine | 20 % लोकांमध्ये अँन्टीबॉडी बनली नाही, बूस्टर डोसला ग्रीन सिग्नल?

Crime News | BoB बँकेच्या महिला अधिकार्‍याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, परिसरात प्रचंड खळबळ

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3,623 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी