Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3,623 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | राज्यात आज (रविवार) दिवसभरात 3 हजार 623 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) आढळून आले आहेत. तर 2 हजार 972 रुग्ण बरे होऊन (Discharge) घरी परतले आहेत. याशिवाय 46 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची (Covid 19 third wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्यापही दैनंदिन रुग्णांची संख्या तीन ते चार हजाराच्या दरम्यान आढळून येत आहे. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. दररोज आढळणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी जास्त कधी कमी आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत 63 लाख 05 हजार 788 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.04 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात आजपर्यंत 64 लाख 97 हजार 877 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 11.61 टक्के आहे. तर राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 142 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.12 टक्के इतके आहे.

राज्यात सध्या 50 हजार 400 सक्रिय (Active patient) रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 59 लाख 79 हजार 898 प्रयोगशाळा (Laboratory tests) नमुन्यांपैकी 64 लाख 97 हजार 877 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्या 2 लाख 98 हजार 207 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत.
तर 1 हजार 892 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

Web Titel :- Coronavirus in Maharashtra | 3,623 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohd. Yakoob Shekha | याकुब शेख यांची भारताच्या हज कमिटीच्या सीईओ (CEO) पदी नियुक्ती

National Women Commission | NWC ची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर टीका; चंद्रमुखी देवी म्हणाल्या – ‘मागील 2 वर्षापासून महिला आयोगाची स्थापना नाही’

MLA P.N. Patil | सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा छळ, एक कोटीची मागणी ! आमदारासह मुला-मुलीवर गुन्हा