Omicron Covid Variant | Delta पेक्षा किती वेगळा आहे Omicron? सर्वप्रथम अलर्ट करणार्‍या दक्षिण अफ्रीकन डॉक्टरने दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस (corona virus) चा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron Covid Variant) ने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. अनेक देशाच्या सरकारांनी परदेशातून येणार्‍या विमानांवर तातडीने प्रतिबंध लावले आहेत. भारतात प्रशासनाकडून नवीन अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. दक्षिण अफ्रीकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष अँजेलिक कोएत्झी (Angelique Koetzi, president of the South African Medical Association) पहिल्या तज्ज्ञ आहेत ज्यांनी कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron Covid Variant) बाबत सरकारला अलर्ट केले होते.

 

ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत जगभरात पसरलेल्या दहशतीच्या वातावरणाबाबत अँजेलिक कोएत्झी यांनी म्हटले की, मी हैराण झाले कारण मी याची अपेक्षाच केली नव्हती, अनेक आठवड्यापासून कोरोनाची कोणतीही केस समोर आली नव्हती, हे आमच्यासाठी असामान्य होते. मी रूग्णांची टेस्ट करण्यास सुरूवात केली ज्यांच्यात अशी लक्षणे होती जी सामान्य वायरल संसर्गाची नव्हती. दक्षिण अफ्रीकेत कोरोना संसर्गाचा दर एक टक्केपेक्षा कमीवर होता.

 

त्यांनी म्हटले की, आम्हाला प्रकरणे समोर येण्याची अपेक्षा डिसेंबरचा शेवट किंवा जानेवारीच्या प्रारंभी सणासुदीच्या काळात होती. अशावेळी आमच्यासाठी हे अकाली होते. मी रूग्णांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या सामान्य वायरल संसर्गासारखी लक्षणे दिसत होती.

 

परंतु तपासणी केल्यानंतर ते कोरोना व्हायरसने संक्रमित (Omicron Covid Variant) असल्याचे समोर आले. मागील आठवड्यात दुजोरा मिळाला की, दक्षिण अफ्रीकेत एक नवीन व्हेरिएंट समोर आला आहे.

त्यांनी म्हटले की, मला वाटते की, हा व्हेरिएंट काही काळापर्यंत राहिल. दक्षिण अफ्रीकेतच नव्हे, तर इतर देशांमध्ये, कारण इतर देशांमध्ये संसर्गाची संख्या वेगाने वाढत आहे. सध्या याबाबत आम्हाला जे माहित आहे ते हे की, संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. सध्या याच्याबाबत आम्हाला केवळ हेच माहित आहे की, आरटी-पीसीआर तपासणीत तो सापडतो. रॅपिड तपासणी सांगू शकते की, तुम्हाला कोविड आहे किंवा नाही. जर संसर्गाची लक्षणे दिसून आली आणि लक्षणे डेल्टासारखी नसतील तर हे मानता येऊ शकते की व्यक्ती ओमिक्रॉनने संक्रमित आहे.

 

शास्त्रज्ञांनी सांगितले की, यामध्ये 30 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत, जे डेल्टा-बीटापेक्षा खुप वेगळे आहे.
जेव्हा शास्त्रज्ञांनी नवी व्हेरिएंटची घोषणा केली तेव्हा, त्यांनी म्हटले की, त्यांना अजूनपर्यंत सर्वकाही समजलेले नाही.
ते केवळ यास अनुक्रमित करत आहेत.

 

सध्या आम्ही जे जाणून घेण्याच्या स्थितीत आहोत, ते म्हणजे, नवीन व्हेरिएंटला आरटी-पीसीआर टेस्ट आणि रॅपिड टेस्ट निष्पन्न करण्यात सक्षम आहे.
टेस्ट या गोष्टीला दुजोरा देतील की, तुम्हाला कोरोना आहे.
नवीन व्हेरिएंटची लक्षणे डेल्टाप्रमाणे नाहीत, यावरून तुम्ही समजू शकता की, हा ओमिक्रॉन आहे.

 

अँजेलिक कोएत्झी यांनी म्हटले की, लक्षणांबाबत बोलायचे तर ओमिक्रॉनने संक्रमित बहुतांश रूग्णांमध्ये थकवा,
शरीर आखडणे ही समस्या दिसून येते. याशिवाय काही रूग्णांमध्ये खुप जास्त प्रमाणात डोकेदुखी आणि कमजोरीची सुद्धा समस्या आहे.
परंतु कोणत्याही रूग्णाने वास आणि चव घेण्याची क्षमता बंद होणे किंवा नाक बंद होणे आणि जास्त तापाचा उल्लेख केलेला नाही.
प्राथमिक स्तरावर याची बहुतांश हलकी प्रकरणे आहेत.

 

Web Title :- Omicron Covid Variant | south african doctor angelique coetzee tells all about new covid variant omicron

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सनं सोडून दिल्यावर हार्दिकनं शेअर केला भावनिक Video

Common Service Centres (CSC) | डॉक्टरांचा सल्ला आता WhatsApp वर; सरकारने आणली ‘ही’ सुविधा

Malaika Arora | बिकनी परिधान करुन मलायका अरोराने उडवले अर्जुन कपूरचे ‘होश’