On Duty Police Died In Accident | पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – On Duty Police Died In Accident | ड्युटी संपवून घरी जात असताना एका पोलीस हवालदाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झला. सचिन नरुटे (वय 38, रा. वाकड – Wakad) असे मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. हा अपघात बंगळुरू – मुंबई महामार्गावर (Mumbai Bangalore Highway) रावेत येथे सोमवारी (दि.15) रात्री साडेदहाच्या सुमारास झाला. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.(On Duty Police Died In Accident)

याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नरोटे हे देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) कार्यरत होते.
कर्तव्यावर असलेले नरुटे सोमवारी रात्री ड्युटी संपवून साडे दहाच्या सुमारास दुचाकीवरुन (एमएच 14 जीव्ही 7750) वाकड येथे घरी जात होते. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.

अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून अखरे उदयनराजे भोसलेंना भाजपाची उमेदवारी; भोसले विरूद्ध शिंदे सामना रंगणार

Vadgaon Sheri Pune News | पुणे : बागेत खेळणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील कृत्य, नारधमास अटक

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीसाठी अजित पवारांनीही घेतला उमेदवार अर्ज, हा प्लॅन ‘बी’ आहे की ‘ए’, राजकीय वर्तुळात चर्चा