शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या ‘Healthy Tea’ कडून गुळाच्या चहाचे मोफत वाटप (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचा सुप्रसिद्ध Healthy tea गुळाचा चहा  यांच्यावतीने  जवळपास 11 शाखांमध्ये मोफत चहा वाटप करण्यात आला. पुणेकर व इतर शहरातील नागरिकांसाठी  Healthy tea गुळाचा चहा पिणे म्हणजे एक आनंदाची पर्वणी ठरली. महाराष्ट्रामध्ये चहाचे खूप मोठ्या प्रमाणात ब्रँड्स आहेत. परंतु अगदी कमी कालावधीमध्ये खास आरोग्यासाठी फायदेकारक healthy tea गुळाचा चहा लोकांच्या पसंतीस आला आहे. नवीन व्यावसायिकांसाठी healthy tea गुळाचा एक संधी उपलब्ध करून देणारा रोल मॉडेल ठरणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

image.png

पुण्याच्या सुप्रसिद्ध Healthy tea गुळाचा चहाचे संचालक काय म्हणतात ?

पुण्याच्या सुप्रसिद्ध Healthy tea गुळाचा चहाचे संचालक सोमनाथ बाळासाहेब शिनगारे म्हणतात, “आमचा मूळ व्यवसाय गुळाचे automatic प्लांट बनवणे, फूड प्रोसेसिंग प्लांट बनवणे हा आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी आमच्या डोक्यामध्ये अशीच एक कल्पना आली की आपण या गुळाला मोठे मार्केट देऊ शकलो तर सर्वसामान्य शेतकरी सुद्धा plant ऊभा करण्याचे डेरिंग करू शकतील. या पार्श्‍वभूमीवर गुळाचा चहा ही संकल्पना उदयास आली.

या संकल्पनेवर जवळजवळ दीड वर्ष काम केले आणि फ्रेंचायजी मॉडेल मध्ये उतरलो. आम्ही आमच्या पहिल्या आउटलेटची सुरुवात सात महिन्यापूर्वी केली, त्याच्यानंतर आम्हाला मार्केटमधून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सात महिन्यांमध्ये जवळ जवळ 25 आउटलेट्स ओपन केले. आता आपल्या शाखा पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, हिंगोली, नांदेड, कल्याण, ठाणे इत्यादी ठिकाणी आहेत. एस एन ए फुड्स इंटरनॅशनल कंपनीचे मूळ धोरण येणाऱ्या दहा वर्षांमध्ये जगभरामध्ये किमान तीन हजार यशस्वी उद्योजक निर्माण करून रोजगार निर्माण करण्यास मदत करणे हा आहे.”

image.png