पुण्यात वीजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे वीजेचा धक्का बसून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

सोमवारी रात्री नऱ्हे येथील महावितरणच्या पॅनलमधून वीज प्रवाह उतरला. त्यावेळी एका व्यक्तीला वीजेचा धक्का बसला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय ४० वर्षे आहे. व्यक्तीने पांढरा रंगाचा शर्ट परिधान केला असून त्यावर निळसर पट्टे आहेत. त्याने निळी पँट परिधान केली आहे. उंची पाच फूट दोन इंच आहे. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज पाटील तपास करत आहेत. या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास त्वरीत सिंहगड पोलीस ठाण्यात (दूरध्वनी-०२०-२४३४८२७०) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You might also like