One Digital ID | PAN, Aadhaar, Passport, DL सर्वांसाठी एकच Digital ID – जाणून घ्या काय आहे नरेंद्र मोदी सरकारचा प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – One Digital ID | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकार आगामी काळात सर्वांसाठी एक डिजिटल आयडी (One Digital ID) आणू शकते. कारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology : MeitY) फेडरेटेड डिजिटल आयडेंटिटीज (Federated Digital Identities : FDI) चे एक नवीन मॉडल प्रस्तावित केले आहे.

 

या अंतर्गत एखाद्या व्यक्तीच्या अनेक डिजिटल आयडींना (उदाहरणार्थ PAN Card, Aadhaar Card, DL, Passport Number पर्यंत) एक वेगळ्या प्रकारच्या आयडीद्वारे आपसात जोडले, आणि अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते.

 

मिनिस्ट्रीचे हे ड्राफ्ट प्रपोजल दि इंडियन एक्सप्रेसने पाहिले आहे. मंत्रालयाने यामध्ये सूचना दिली आहे की, हा डिजिटल आयडी लोकांना या आयडीच्या (Identities) नियंत्रणात ठेवून आणि त्यांना हे निवडण्याचा पर्याय देईल की, त्यांना कोणते काम/हेतूसाठी कोणत्या आयडीचा वापर करायचा आहे.

 

 

प्रस्तावानुसार, एफडीआय एक रजिस्ट्रीच्या चावीप्रमाणे काम करेल, जिथे सर्व वेगवेगळी राज्य आणि केंद्रीय आयडी स्टोअर केले जाऊ शकतात. लोक ऑथेंटिकेशन आणि सहमतीच्या ईकेवायसी (eKYC) द्वारे बाकी थर्ड पार्टी सेवांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल आयडीचा वापर करू शकतात.

 

ड्राफ्ट प्रपोजल म्हणते की, एका व्यक्तीचे सर्व डिजिटल आयडी एकमेकांसोबत लिंक केले जाऊ शकतात.
ही गोष्ट वारंवार व्हेरिफिकेशन प्रोसेस (पडताळणी प्रक्रिया) ची गरज बंद करेल. (One Digital ID)

 

मंत्रालयाने इंडिया एंटरप्राईज आर्किटेक्चर (इंडईए) 2.0 [India Enterprise Architecture (IndEA) 2.0.] च्या अंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे.
असे समजले जाते की, हा प्रस्ताव लवकरच सार्वजनिक केला जाऊ शकतो.
मंत्रालय यावर 27 फेब्रुवारीपर्यंत टिप्पणी मागेल. एफडीआयशिवाय नवीन फ्रेमवर्कने अनेक
सरकारी एजन्सीसाठी तीन प्रमुख आर्किटेक्चरल पॅटर्न सुद्धा प्रस्तावित केले आहेत.

 

इंडईएला पहिल्यांदा 2017 मध्ये सरकारी संघटनांच्या व्यावसायिक दृष्टिकोणासह आयटी विकासाचे
अलायन्मेंट सक्षम करण्यासाठी प्रस्तावित आणि डिझाईन केले गेले होते. तेव्हापासून संरचना अपडेट केली आहे.

 

2.0 व्हर्जनमध्ये InDEA एक अशा संरचनेचा प्रस्ताव करतो, जो सार्वजनिक आणि
सोबतच खासगी क्षेत्रातील कंपन्यांना ग्राहकांना समग्र आणि एकत्रित सेवा (ज्या त्यांच्या संघटनात्मक सीमांच्या पलिकडे जाऊ शकतात.)
देण्यासाठी आयटी आर्किटेक्चरची निर्मिती आणि डिझाईन करण्यात सक्षम करते.

 

Web Title :- One Digital ID | pan aadhaar passport dl one digital id for all know what is narendra modi govt plan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा