Jammu and Kashmir | सुरक्षा दलांना मिळालं मोठं यश ! जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) गेल्या 12 तासात दोन ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Toiba) आणि जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) पाच पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्यांचा खात्मा (Terrorists Killed) करण्यात आला आहे. ठार झालेल्या दशतवाद्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानीचा (Jaish Commander Zahid Wani) समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा (Pulwama)आणि बडगाम Budgam मध्ये ही चकमक झाली असून बडगाम मधील कारवाई दरम्यान दहशतवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

 

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार (Kashmir IGP Vijay Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. गेल्या 12 तासात झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी संघटनांच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार केलेल्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश असून सुरक्षा दलांचे (Security Force) हे मोठे यश आहे.

सीआरपीएफ (CRPF) आणि पोलिसांनी (Police) बडगाममधील तिलसर, चरार-ए-शरीफ (Charar-e-Sharif Tilsar) येथे रात्री 10 वाजता शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार (Firing) सुरू केला.त्यामुळे प्रत्युत्तरात जवानांनी देखील गोळीबार केला. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं. त्याच्याकडून एके-56 (AK-56) रायफलही जप्त (Rifle Seized) करण्यात आली आहे. (Jammu and Kashmir)

दरम्यान, गेल्या आठवड्यात शोपियानमध्ये (Shopian) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.
घटनास्थळावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं होतं.
ठार केलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाच्या (LeT) रेझिस्टन्स फ्रंटचे होते.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या किलबाल भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर सुरक्षा दलांनी त्या परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.

 

Web Title :- Jammu and Kashmir | jammu and kashmir jem commander zahid wani among 5 terrorists killed in twin encounters within few hours

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा