तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार

शिरोळ (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – कार-ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने दुचाकीवरील सुरेश शंकर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कोल्हापूर-सांगली बायपास रोडवर जैनापूर येथे आज दुपारी झाला. अपघातानंतर मयत चव्हाण यांची दुचाकी जळून खाक झाली तर ट्रॅव्हल मधील १० प्रवाशी जखमी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोल्हापूर- सांगली मार्गावरील जैनापूर इथं कोल्हापूरहून सांगलीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने (KA-51-AC-7547) ट्रकला ओव्हटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी जवळपास दोनशे फूट फरफटत गेली. यामध्ये सांगलीहुन रुकडीला आपल्या घरी जाणाऱ्या सुरेश चव्हाण (रा. रुकडी ता. हातकणंगले) यांचा जागीच मृत्यू झाला.

कोल्हापूर-सांगली बायपास रोड जैनापूर येथे ही घटना घडली असून, धडक इतकी जोराची होती की, यामध्ये सुरेश चव्हाण याची दुचाकी जळून खाक झाली. तर ट्रॅव्हल्स बाजूच्या शेतात पलटी झाली. यामध्ये २७ प्रवाशी होते यापैकी १० प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेची माहीती मिळाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर मयत चव्हाण यांना शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या अपघाताची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us