राज्यातील आयटीआय (ITI) मध्ये एक लाख ३७ हजार जागा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यभरातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण (ITI ) संस्थांमध्ये यंदा जवळपास एक लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय आयटीआय – ८९ हजार ६१६ जागा तर खासगी आयटीआय -४७ हजार ६८२ जागा आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून, ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेत शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये जागा आहेत त्यात सर्वात जास्त जागा या पुणे विभागात आहेत. प्रवेशप्रक्रियेबाबत सविस्तर माहिती ‘https://admission.dvet.gov.in’’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शासकीय तसेच खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये ३० जूनपर्यंत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली.

कुठे किती जागा ?

पुणे विभाग -२८ हजार ४३२

अमरावती -१ ७ हजार ८०

औरंगाबाद विभागा- १८ हजार ४८०

मुंबई विभाग- १९ हजार ८३२

नागपूर विभाग -२६ हजार ५७६

नाशिक विभाग -२६ हजार ९००

प्रवेशप्रक्रियेबाबत सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in’’ या संकेत स्थळावर ..

आरोग्य विषयक वृत्त – 

शाळांमध्ये लागणार तंबाखूविरोधी फलक

महाराष्ट्रात ‘निपाह’चा धोका नाही ; मात्र खबरदारी घ्या

बोगस पॅथॉलॉजी लॅबकडे महापालिकांचे दुर्लक्ष

बी. जे. महाविद्यालयात ‘पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन’ विशेष कोर्स